News Flash

‘हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार’, मनसेचा खळखट्याकचा इशारा

'हाऊसफुल ४'मुळे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने मनसेने पुन्हा एकदा खळखट्याकचा इशारा दिला आहे. 

हिरकणी या आगामी मराठी चित्रपटाला थिएटर दिले नाही तर काचा फुटणार, असा सणसणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ हा चित्रपट येत्या २४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे तर अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ४’ २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘हाऊसफुल ४’मुळे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने मनसेने पुन्हा एकदा खळखट्याकचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात बुधवारी (२३ ऑक्टोबर) मनसे कार्यकर्ते थिएटर मालकांची भेट घेणार आहेत. ‘मराठी चित्रपटाला स्क्रीन देण्यासाठी आम्ही भांडतोय. तो आमचा हक्कच आहे. त्यामुळे थिएटर मालकांनी आम्हाला स्क्रीन द्यावी अन्यथा पुढे होणाऱ्या परिणामाला सामोरे जावं,’ असा इशारा मनसेनं दिला आहे.

उत्तम कथानक, तगडी स्टारकास्ट या सर्व गोष्टींमुळे मराठी चित्रपटांनी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. परंतु अनेकदा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटांचा चांगला आशय असूनही चित्रपटगृह उपलब्ध होणे कठीण होते. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह उपलब्ध नसल्यामुळे अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 4:48 pm

Web Title: mns on marathi movie hirkani for not getting screens because of housefull 4 ssv 92
Next Stories
1 #Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा
2 Video : वर्षभरानंतर अंकुश चौधरी येतोय ‘ट्रिपल सीट’
3 …म्हणून सोनाली कुलकर्णी वर्षभर ब्युटी पार्लरमध्ये गेली नाही
Just Now!
X