23 November 2020

News Flash

आम्ही लग्नाचा विचार केलाय, पण…

अंकिता आणि मिलिंद गेल्या बऱ्याच दिवसांपासून लिव्ह इनमध्ये राहात असल्याचं कळत आहे

मिलिंद सोमण. अंकिता कोनवार

मॉडेलिंग विश्वात नावारुपास आल्यानंतर अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणारा मिलिंद सोमण आता शारीरिक सुदृढतेवर जास्त भर देताना दिसतोय. सोशल मीडिया अकाऊंटवरुनही तो फिटनेस, मॅरेथॉन, पिंकथॉन या सर्व गोष्टींचे प्रमोशन करतोय. वयाची पन्नाशी उलटली असतानाही मिलिंदची सुदृढ शरीरयष्टी अनेकांसाठी चर्चेचा विषय आहे. या साऱ्यातच आणखी एका गोष्टीकडेही मिलिंदच्या चाहत्यांचे लक्ष आहे. ती गोष्ट म्हणजे त्याचे खासगी आयुष्य. तरुणींच्या गळ्यातील ताईत असणारा मिलिंद सोमण सध्या अंकिता कोनवारला डेट करतोय.

अंकिता आणि मिलिंद गेल्या बऱ्याच दिवसांपासून लिव्ह इनमध्ये राहात असून, येत्या काही दिवसांमध्ये ते लग्न करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. त्याचविषयी मिलिंदला एका कार्यक्रमात विचारले असता त्याने या प्रश्नाचं उत्तर दिलं. येत्या काळात तू अंकितासोबत लग्न करणार का, असा प्रश्न विचारला असता मिलिंद म्हणाला, ‘आम्ही लग्नाचा विचार करतच आहोत. किंबहुना अंकिता आणि मी त्याविषयी चर्चासुद्धा केलीये. पण, लग्नाची तारीख ठरलेली नाही. तिच्यासोबत लग्न झालं तर माझ्यासारखा आनंदी दुसरा कोणीच नसेल.’

‘मंक’चा प्याला प्यायलेल्या संजय मिश्राला पाहिलात का?

एका मासिकाच्या अनावरण सोहळ्याला पोहोचलेल्या मिलिंदने त्यावेळी अंकिताची प्रशंसाही केली. ‘अंकिता खूपच चांगली असून, माझ्यासारखा प्रियकर मिळणं, हेसुद्धा तिचं नशिबच आहे’, असंही तो मिश्किलपणे हसत म्हणाला. आपल्या नात्याविषयी मिलिंदने केलेले हे वक्तव्य पाहून २०१८ मध्ये तोही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मिलिंद सोमण त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच प्रकाशझोतात असतो. प्रेमाला वयाची मर्यादा नसते, अशा मतावर ठाम असणाऱ्या मिलिंदने २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत लग्न केलं होतं. पण, अवघ्या तीन वर्षांच्या संसारानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 5:47 pm

Web Title: model actor milind soman on marriage plans with girlfriend ankita konwar
Next Stories
1 VIDEO : सोनाली कुलकर्णीच्या ‘गुलाबजाम’ची रेसिपी पाहिलीत का?
2 अभिनेत्री चारु रोहतगी यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन
3 नवरा असावा तर असा : नम्रता आवटे आणि विशाखा सुभेदारसोबत रंगला मकरसंक्रांत विशेष भाग
Just Now!
X