बॉलीवूडच्या रुपेरी दुनियेतून थेट रस्त्यावर येण्याची वाईट वेळ एका अभिनेत्रीवर आली आहे. बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीसोबत काम केलेली अलिसा खान सध्या दिल्लीच्या रस्त्यावर गुजराण करत आहे.

वाचा : गेम ऑफ थ्रोन्समध्ये उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला कोट्यवधींचा भाव

अलिसाचे करियर अगदी व्यवस्थित चालू असतानाही तिच्यावर रस्त्यावर गुजराण करण्याची वेळ आली. इंडिया टूडेने अलिसावर इतकी वाईट परिस्थिती ओढावण्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असे समजले की, अलिसाच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराने त्या दोघांमधील काही खासगी क्षणांचा व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तिला दिली होती. पण केवळ धमकीवर न थांबता त्याने एक व्हिडिओ युट्यूबवर प्रसिद्धदेखील केला. त्यामुळे अलिसाने पोलिसांमध्ये जाऊन त्याच्याविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर सदर व्हिडिओ युट्यूबवरून हटविण्यात आला. पण अलिसाचे पोलिसांमध्ये जाणे तिची आई आणि भाऊ यांना पटले नाही. त्यामुळे त्यांनी तिला घराबाहेर हकलवून दिले. घरातून हाकलल्यानंतर अलिसा आता मंदिरात, रस्त्यावर तसेच मित्र-मैत्रिणींच्या घरात आश्रय घेत आहे.

वाचा : क्रिती सनॉनवर भैरवी गोस्वामीची अर्वाच्च शब्दांत टीका

अलिसा ही गाझियाबादच्या वजीर गाजी-उद्दीनच्या घराण्यातील आहे. अलिसाच्या पूर्वजांनी गाजियाबाद शहर वसवल्याचे म्हटले जाते. अलिसाने माय हसबण्डस वाइफ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. तसेच तिने काही व्हिडिओंमध्येदेखील काम केले आहे. अलिसाने इम्रान हाशमीसोबत ‘आएना’ चित्रपटात काम केले आहे.