मॉडेल मरीना कुंवरने राम रहीम आणि हनीप्रीतसंदर्भात नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. राम रहीमने सुरूवातीला तिला मुलगी मानून सिनेमात काम करण्याची ऑफर दिली आणि नंतर तिच्यासोबत गैरव्यवहार केला. एवढेच नाही तर मरीनाच्या म्हणण्यानुसार, एकीकडे राम रहीम तिच्यासोबत गैरव्यवहार करायचा तर दुसरीकडे हनीप्रीत मरीनाच्या प्रियकरासोबत नात्यात येऊ पाहत होती.

एवढेच बोलून ती थांबली नाही तर पुढे म्हणाली की, राम रहीमने तिला सिनेमाशी निगडीत गोष्टींवर चर्चा करण्यासाठी अनेकदा गुहेत जायला सांगितले होते. राम रहिम कोकिनसारखे अमली पदार्थ घ्यायचा. राम रहिम आणि हनीप्रीत तुरूंगात गेल्यामुळेच मरिना आणि तिच्या प्रियकराने हे सगळे सांगायचे ठरवले. एकदा राम रहीम तिला काही तरी खास सांगण्याच्या बहाण्याने तिला बेडरुमपर्यंत घेऊन गेला होता. तिथे गेल्यावर तिला बोलला की, तुला पैसे किंवा इतर कोणत्याही गोष्टीची चिंता करायची गरज नाही. राम रहीमचे तिच्या जवळ येणे हनीप्रीतला फारसे पटायचे नाही म्हणून हनीप्रीत तिचा त्रागा करायची.

तर मरिनाच्या प्रियकराच्या म्हणण्यानुसार, हनीप्रीत त्याला फोन करायची आणि त्याच्यासोबत नात्यात येण्यासाठी प्रयत्नही करत होती. दरम्यान, हरियाणा पोलिसांनी हनीप्रीतला पंचकुला न्यायालयासमोर हजर केले असून तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.