News Flash

सुशांत बायोपिक : स्टार किड्सला लाँच करणाऱ्या निर्मात्याची भूमिका साकारणार ‘हा’ मॉडेल

तो 'द नेपोकिंग'ची भूमिका साकारणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपट निर्माते विजय शेखर गुप्ता या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘सुसाइट ऑर मर्डर’ असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटात टिक-टॉक स्टार सचिन तवारी सुशांतच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मॉडेल राणा एका चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारणार आहे.

VSG Binge यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटासंबंधी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मॉडेल राणा ‘सुसाइट ऑर मर्डर’ या चित्रपटात एका चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘तो एक मोठा चित्रपट निर्माता आहे. पण तो फक्त स्टार किड्सला लाँच करतो. मॉडेल राणा Nepoking ची चित्रपटात भूमिका साकारणार आहे’ असे त्यांनी म्हटले आहे. सध्या त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसेच चहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

यापूर्वी या चित्रपटात उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये राहणारा टिकटॉक स्टार सचिन तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले होते. सचिनने इन्स्टाग्रावर पोस्ट करत तो चित्रपटात ‘द आउटसायडर’ची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शामिक मौलिक करणार आहेत. तसेच चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच हे पोस्टर प्रदर्शित करत विजय शेखर गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखती मध्ये त्यांनी चित्रपटात कोणत्या गोष्टी अधोरेखीत करण्यात आल्या आहेत हे सांगितले होते. ‘मी हा चित्रपट यासाठी करत आहे जेणे करुन मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे मोठे स्टार्स आणि प्रोडक्शन हाउसची एकाधिकारशाही आहे ती संपवली पाहिजे या हेतूने मी हा चित्रपट बनवत आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

‘आज इंडस्ट्रीमध्ये जी बाहेरुन मुले येतात त्या मुलांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये तयार झालेल्या गँगमुळे योग्य ती संधी मिळत नाही. या गँगला मी तोडू इच्छितो. माझ्या कथेमध्ये ते सगळं असणार आहे जे सुशांतसोबत घडले आहे. त्या मुलाला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले. त्याच्याकडून एकापाठोपाठ एक चित्रपट काढून घेण्यात आले’ असे त्यांनी पुढे म्हटले होते.

या चित्रपटात सुशांतचा जीवन प्रवास दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 9:49 am

Web Title: model rana to play nepoking in suicide or murder avb 95
Next Stories
1 ऐश्वर्या-आराध्या करोनामुक्त; बिग बी म्हणाले…
2 सुशांतने अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केलं होतं? स्वस्तिका मुखर्जीचा खुलासा
3 सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी करण जोहरचा जबाब नोंदवला जाणार
Just Now!
X