अजिंठा चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी रिना अग्रवाल नेहमीच वेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचली आहे. वास्ताविक जीवनातले राहणीमान आणि विचारसरणींपेक्षा अतिशय वेगळे रोल तिने स्वीकारले आहेत. कोणत्याही कलाकाराला एखादी भूमिका साकारताना त्या भूमिकेसाठी आपल्या जीवनशैलीतल्या अनेक गोष्टींमध्ये बदल कराण्याची गरज असते. भूमिकेसाठी लागणारी भाषा, राहणीमान, पेहराव या सगळ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. आणि रिनाने नेहमीच तिच्या भूमिकांना ह्या सगळ्या गोष्टींद्वारे शंभर टक्के न्याय दिला आहे.

रिनाने मराठीसोबतच हिंदीतही आपली ओळख निर्माण केली. “तलाश” या हिंदी सिनेमात ती एका डॅशिंग महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर हिंदी मालिका “एजंट राघव” मध्येही ती झळकली. पण नुकत्याच आलेल्या “कलर्स मराठी” वरील एका जाहिरातीतला तिचा टॅक्सी ड्राइव्हरचा लूक सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारा होता.

Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”

गौरवर्णीय असलेली रिना मात्र आता आपला मॉडर्न अंदाज बाजूला ठेऊन ‘झाला बोभाटा’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सावळा रंग आणि अतिशय साधे राहणीमान असलेल्या एका खेडेगावातल्या मुलीची भूमिका ती ह्या सिनेमात साकारताना दिसणार आहे. दिलीप प्रभावळकर, संजय खापरे, कमलेश सावंत, भाऊ कदम, मयुरेश पेम यांच्यासोबत ती मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ‘झाला बोभाटा’ तला हा तिचा गावराण लूक प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडतोय हे लवकरच कळेल.

अनुप जगदाळे दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. ‘झाला बोभाटा’ हा सिनेमा एका गावावर चित्रीत करण्यात आला आहे. आता गाव आलं की बारा भानगडी आल्या आणि त्यात ती मान्याची वाडी तर अग्रेसरच म्हणा. मान्याची वाडी फक्त आदर्श गाव पुरस्कार असला की नटते-सजते, सोहळा संपला की मात्र जैसे थे. भ्रष्टाचार, स्वच्छता, पाणीटंचाई, दारूबंदी अशा अनेक प्रश्नांना कंटाळून गेलेले हे गावकरी. दिलीप प्रभावळकर आजारी असतात असे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. काहींना दिलीप प्रभावळकर जगावे असे वाटत असते तर काही ते लवकर मरावे म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतात. दिलीप प्रभावळकर यांच्याकडे एका बाईचे गुपित असते पण ती बाई कोण हे ते काही केल्या सांगत नाहीत. नेमकी त्या बाईचे नाव ऐकण्यासाठी गावातले लोक प्रयत्न करतात. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळतं की नाही हे पाहण्यासाठी मात्र ६ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल.