19 October 2019

News Flash

स्वप्निल म्हणतोय, ‘पैशांनी श्रीमंत होणं सोपं, नात्यांनी समृद्ध होणं कठीण’

'मोगरा फुलला' या चित्रपटात एक प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे.

'मोगरा फुलाल'मधील स्वप्नील जोशीचा नवा लूक पाहिला का?

चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा स्वप्नील जोशी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिलखुलास अंदाज, बेधडक वागणे या सर्व गोष्टींमुळे स्वप्नीलने अनेकांची मने जिंकली आहेत. आता स्वप्नील जोशी दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांच्या ‘मोगरा फुलला’ चित्रपटात दिसणार आहे. चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

स्वप्निलच्या ‘मोगरा फुलला’ या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला असल्याचे चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे. पोस्टरमध्ये स्वप्निल एका अनोख्या रुपात पाहायला मिळाला आहे. त्याचा पोस्टरवरील हा नवा अवतार पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत आणखी उत्सुकता वाढली आहे. तसेच पोस्टरवर ‘पैशांनी श्रीमंत होणं सोपं, नात्यांनी समृद्ध होणं कठीण’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.  चित्रपटाचे दिग्दर्शन श्रावणी देवधर करणार असून निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी केली आहे.

‘मोगरा फुलला’ या चित्रपटात एक प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. तसेच मध्यवर्गीय कुटुंबातील सुनील कुलकर्णी लग्नाचे वय उलटून गेले तरी कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकून राहतो. परंतु एकद दिवस अचानक सुनील श्रीमंत घराण्यातील स्वतंत्र बाणा आणि व्यक्तिमत्वाच्या तरूणीच्या प्रेमात पडतो. अशी आगळी वेगळी कथा ‘मोगरा फुलला’ चित्रपटातून लोकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांनी या आधी ‘लपंडाव’,’लेकरु’ आणि ‘सरकारनामा’ अशा दर्जेदार पण मोजक्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच त्यांना फिल्मफेअरसारखे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच चित्रपट निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी ‘फुगे’, ‘तुला कळणार नाही’, ‘रणांगण’ अशा चित्रपटांची निर्माती केली आहे.

First Published on April 15, 2019 1:04 pm

Web Title: mogara fulala movie poster released