मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाला. ५ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर करण्यात आला आहे. गौरव पदक, २५ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 5, 2018 7:16 pm