07 April 2020

News Flash

‘अग्निहोत्र 2’मध्ये मोहन जोशींची होणार एन्ट्री

चिंतामणी काकांच्या येण्याने मालिकेत नवीन वळण येणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील अग्निहोत्र २ मालिकेत लवकरच मोहन जोशींची एण्ट्री होणार आहे. अग्निहोत्रच्या पहिल्या पर्वात मोहन जोशींना आपण चिंतामणी अग्निहोत्रींच्या भूमिकेत पाहिलंय. दुसऱ्या पर्वातही चिंतामणी अग्निहोत्रींच्या येण्याने नवा ट्विस्ट येणार आहे.

अग्निहोत्र २ मध्ये अक्षरा तिच्या वडिलांवर लागलेला कलंक पुसण्यासाठी पुरावे गोळा करत आहे. त्यासाठी तिला चालुक्यकालीन सात मोहरांचा शोध घ्यायचा आहे. चिंतामणी काकांच्या येण्याने अक्षराच्या या शोधाला नवीन वळण मिळणार आहे. त्यामुळे अग्निहोत्र २ मालिकेचा पुढील प्रवास अनेक रहस्यमय आणि रोमांचक असेल यात शंका नाही.

आणखी वाचा :पुण्यात अभिनेत्रीला सोन्याची अंगठी चोरताना अटक

तब्बल १० वर्षांनंतर ‘अग्निहोत्र २’ ही लोकप्रिय मालिका नव्या कथेसह स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झाली आहे. आजही अग्निहोत्र मालिकेविषयी आणि मालिकेतल्या पात्रांविषयी प्रेक्षकांमध्ये जिव्हाळा आहे. पहिल्या पर्वातलं अग्निहोत्री कुटुंब आणि आठ गणपतींच्या रहस्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘अग्निहोत्र २’ मध्ये नव्या पिढीची नवी गोष्ट आणि सप्तमातृकांचं रहस्य उलगडत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 10:25 am

Web Title: mohan joshi in agnihotra 2 marathi serial ssv 92
Next Stories
1 सारा अली खानला आहे ‘हा’ आजार; मुलाखतीत केला खुलासा
2 ‘मला हेच करायचे आहे’; कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना नुसरतचं बेधडक उत्तर
3 ‘रात्रीस खेळ चाले 2’ मधील या व्यक्तीचं निधन; अपूर्वा नेमळेकरने वाहिली श्रद्धांजली
Just Now!
X