News Flash

MOM Movie Trailer: देव सगळीकडे नसतो म्हणून त्याने ‘आई’ बनवली

श्रीदेवीचा हा ३०० वा सिनेमा आहे

अभिनेत्री श्रीदेवीचा बहुप्रतिक्षीत ‘मॉम’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यात श्रीदेवीचा जुना दमदार अंदाज दिसून येत आहे. अक्षय खन्नाचीही झलक या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसते. पण या ट्रेलरची सर्वात खास गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीचा हटके लूक.

२०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमानंतर श्रीदेवीचा हा दुसरा सिनेमा आहे. बोनी कपूर यांनीच या सिनेमाचा निर्मिती केली आहे. रवी उदयवार दिग्दर्शित मॉम हा सिनेमा श्रीदेवीसाठी यासाठीही खास आहे कारण हा तिचा ३०० वा सिनेमा आहे. या थरारपटात अशा एका आईची कथा सांगण्यात आली आहे जी आपल्या मुलीसोबत झालेल्या एका घटनेनंतर कोणत्यातरी गोष्टीचा शोध घेताना दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये श्रीदेवीला दाक्षिणात्य लूकच देण्यात आला आहे. पण दयाशंकर ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नवाजला जो लूक देण्यात आला आहे तो पाहून पटकन नवाजला ओळखताही येत नाही.

‘मॉम’ हा सिनेमा ७ जुलैला प्रदर्शित होणार आहे. सुरूवातीला हा सिनेमा सैफ अली खानचा ‘शेफ’ आणि श्रद्धा कपूर हिचा ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ या दोन सिनेमांसोबत १४ जुलैला प्रदर्शित करण्यात येणार होता. पण मॉम सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा एक आठवडा आधीच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.

मृत्यूच्या खोट्या बातमीवर शाहरुख म्हणतो…

२ मिनिटं ५ सेकंदाचा हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच हा ट्रेलर १५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला. ज्यांना हा ट्रेलर आवडला नाही त्यांच्यापेक्षा आवडलेल्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे प्रेक्षकांना हा ट्रेलर आवडल्याचे दिसते. १ एप्रिलला या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. ज्याला सुमारे ७० लाख लोकांनी यूट्यूबवर पाहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2017 7:33 pm

Web Title: mom trailer release sridevi nawazuddin siddiqui akshay khanna acting mesmerizing
Next Stories
1 सायकॉलॉजिकल थ्रिलर ‘मांजा’चा टिझर प्रदर्शित
2 मृत्यूच्या खोट्या बातमीवर शाहरुख म्हणतो…
3 …तर मी चित्रपटसृष्टी सोडेन; कमल हसनची जीएसटीवर नाराजी
Just Now!
X