News Flash

‘शूटिंगचा पहिला दिवस होता आणि…’, ‘मोमो’ने सांगितला अनुभव

मीरा जगन्नाथने मोमो ही भूमिका साकारली आहे.

या मालिकेत ‘मोमो’ ही विनोदी भूमिका साकारत आहे.

झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही लोकप्रिय मालिका आणि त्यातील सर्व व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या सुरुवातीपासूनच पसंतीस पडली आहेत. यातील एक लक्षवेधी व्यक्तिरेखा म्हणजे ‘मोमो’. या मालिकेत ‘मोमो’ ही विनोदी भूमिका साकारणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिचं प्रेक्षक, चाहत्यांकडून कौतुक झाले. या भूमिकेने तिला ओळख मिळवून दिली.

या भूमिके विषयी बोलताना ती म्हणाली, ‘सहकलाकारांशी बोलताना अगदी माझ्या पालकांशी बोलतानाही मी मोमो बोलते तसेच उच्चार करते तसं बोलायची सवयच झाली आहे. घरी गेल्यावरही तसं बोलले, की भूमिकेतून बाहेर ये गं, असं सगळे सांगतात. ही भूमिका चाहत्यांना आवडतेय हे कळलं की भूमिका साकारायला आणखी मजा येते. ऑडिशन दिलं तेव्हा अमेरिका रिटर्न मुलगी एवढीच तिची ओळख होती. हळूहळू ती भूमिका फुलत गेली.’

 

View this post on Instagram

 

A post shared by ira Jagannath (@mirajagga)

‘येऊ कशी तशी नांदायला’ मालिकेतील सहकलाकरांसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला. ‘मालिकेचा पहिला दिवस होता आणि माझं चित्रीकरण शुभांगी गोखले, अदिती सारंगधर या कसलेल्या कलाकारांसोबत होतं. भीती वाटली. त्यांनी खूप धीर देत समजून घेतलं. तिथं अदिती माझी एवढी काळजी घेत होती, की मला आईची आठवण यायची. मी तिच्याजवळ रडायचेही. मालिका असो किंवा वैयक्तिक काही सांगणं, तिनं खूप समजून घेतलं. तिचा सल्ला नेहमीच माझ्यासाठी मोलाचा आहे. शुभांगीताई समोर आल्यावरही मला आईची आठवण येते.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:54 pm

Web Title: momo yeu kadhi tashi me nandayla meera jaganath talk about experience avb 95
Next Stories
1 अखेर आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर..
2 विशाल निकम साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा ‘शिवा काशिद’
3 KGF Chapter 2 चा भन्नाट टीझर पाहिलात का? २०० मिलियन व्ह्यूज
Just Now!
X