21 January 2021

News Flash

मोनालिसा बागल निघाली ‘भिरकिट’च्या सवारीला

‘सैराट’ फेम तानाजीदेखील या चित्रपटाचा भाग आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मोनालिसा बागल लवकरच मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “सच्चा लव्ह है, तो मुमकीन है… स्वागत तो करो हमारा” असं म्हणत तिने इंस्टाग्रामवरुन तिच्या नव्या चित्रपटाची हिंट दिली होती. ‘भिरकिट’ हा तिचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

अनुप जगदाळे लिखित आणि दिग्दर्शित ‘भिरकिट’ हा मोनालिसा बागलचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून तिच्या चाहत्यांनी तिचं दणक्यात स्वागत आणि कौतुक केलं आहे. आणखी एक सरप्राईज यातून मिळाले आहे ते म्हणजे ‘सैराट’ फेम तानाजी गालगुंडे. तानाजी देखील या चित्रपटाचा भाग आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तानाजी आणि मोनालिसा पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहेत.

आणखी वाचा : नेहा कक्करची लगीनघाई; मेहंदी व हळदीचे फोटो व्हायरल

उडणारा धुरळा, स्कूटर, हाती कलश, हवेत उडणारी ओढणी, मोनालिसाच्या चेह-यावरील स्मित हास्य, सोबतीला तानाजी आणि बॅकग्राऊंडला जबरदस्त म्युझिक या सर्व गोष्टी कमालीची उत्सुकता वाढवत आहेत. पण सर्व काही अजूनही गुलदस्त्यात असल्यामुळे मोनालिसाकडूनच या चित्रपटाची पुढील माहिती कधी मिळते याची प्रतिक्षा करावी लागेल. क्लासिक एंटरप्राईज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 5:42 pm

Web Title: monalisa bagal bhirkit marathi upcoming movie with sairat fame tanaji galgunde ssv 92
Next Stories
1 तरुणाईला थिरकायला लावणारं पार्थ-प्रथमेशचं भन्नाट गाणं
2 Photos : नेहा कक्करची लगीनघाई; मेहंदी व हळदीचे फोटो व्हायरल
3 सुशांत मृत्यू प्रकरण : बेपत्ता असल्याच्या चर्चांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
Just Now!
X