News Flash

‘मनी हाईस्ट’मधील प्रोफेसरच्या डान्सवर तरुणी फिदा; पाहा व्हिडीओ

प्रोफेसरची भूमिका साकारणारा Álvaro Morte हा अभिनेता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

‘ला कासा दे पपेल’ (La Casa De Papel) या स्पॅनिश वेब सीरिजची इंग्रजी आवृत्ती ‘मनी हाईस्ट’ (Money Heist) चांगलीच चर्चेत आहे. जगभरात लोकप्रिय झालेल्या या वेब सीरिजचा चौथा सिझन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या सीरिजमधल्या कलाकारांविषयी आणि विशेषत: प्रोफेसरविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. प्रोफेसरची भूमिका साकारणारा Álvaro Morte हा अभिनेता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या वेब सीरिजच्या कलाकारांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पैशांच्या चोरीभोवती ‘मनी हाईस्ट’ची कथा फिरते. यात प्रोफेसर हा मास्टरमाईंड असतो. चोरी करण्यासाठी तो आठ जणांची निवड करतो. ही टीम ऑनस्क्रीन जशी आहे त्याच्या एकदम विरुद्ध ती ऑफस्क्रीन पाहायला मिळते. थायलंडमध्ये छोट्याशा पार्टीसाठी हे आठ जण जमले होते. हॉटेलच्या रुममध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ त्यातील एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र या व्हिडीओत प्रोफेसरच्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधलंय.

वेब सीरिजमध्ये टोक्योची भूमिका साकारणारी अभिनेत्री Úrsula Corberó हिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘आनंदाचे क्षण’ असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओत प्रोफेसरने डान्स करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. अफाट बुद्धिचातुर्य असलेला व्यक्ती, अत्यंत हुशार, अभ्यासू अशी त्याची वेब सीरिजमध्ये भूमिका आहे. त्यामुळे त्याचा हा निराळा अंदाज पाहून चाहते त्याच्या प्रेमातच पडले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 1:47 pm

Web Title: money heist fans go gaga over professor dancing with unbuttoned shirt watch video ssv 92
Next Stories
1 Video : प्रत्येकाने १०० रुपयांची मदत करा; आशा भोसलेंचं आवाहन
2 तुम्हाला काय वाटलं इतक्या सहज निघून जाईन?; कोमोलिका आता झाली करोनिका
3 रामायण : हनुमानाने पर्वत उचलताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Just Now!
X