News Flash

‘मनी हाइस्ट’मधल्या ‘इन्स्पेक्टर रकेल’ने गायलं सलमानचं ‘चुनरी चुनरी’ गाणं; पाहा व्हिडीओ

इतझियारने बॉलिवूड डान्स प्रचंड आवडत असल्याचं सांगितलं.

नेटफ्लिक्सची ‘मनी हाइस्ट’ ही वेब सीरिज सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या या सीरिजने आपल्या अनोख्या पटकथेच्या जोरावर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या सीरिजमधील कलाकारांचं बॉलिवूड कनेक्शन अनेकदा पाहायला मिळालं. आता त्यात इन्स्पेक्टर रकेलची भूमिका साकारणारी अभिनेत्री इतझियार इत्योनोचा बॉलिवूड गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

‘न्यूज १८’च्या ‘शोशा’ या कार्यक्रमात इतझियारने बॉलिवूड डान्स प्रचंड आवडत असल्याचं सांगितलं. त्याचसोबत तिने सलमान खान व सुश्मिता सेन यांच्यावर चित्रित केलं ‘चुनरी चुनरी’ हे गाणंसुद्धा गायलं. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमधल्या चित्रपटात काम करायची इच्छादेखील तिने व्यक्त केली.

‘नैरोबी’ने साकारलेली भारतीय महिलेची भूमिका

या सीरिजमधल्या कलाकार हे त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे आज जगभरामध्ये लोकप्रिय झाले आहेत. या व्यक्तीरेखांपैकी एक म्हणजे नैरोबी. सर्वांची काळजी घेणारी, सर्वांना समजून घेणारी नैरोबी पडद्यावर साकारणारी अल्बा फ्लोरेसचा मोठा चहतावर्ग निर्माण झाला आहे. ‘व्हाइसेंटे फेरेर’ या स्पॅनिश चित्रपटामध्ये अल्बाने आंध्रप्रदेशमधील एका ग्रामीण भागातील महिलेची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये अल्बाने साकारलेल्या भूमिकेचे नाव शामिरा असं होतं. यामध्ये अल्बा अगदी एखाद्या दाक्षिणात्य कलाकाराप्रमाणे व्यवस्थित तेलगू संवाद बोलताना दिसत आहे.

आणखी वाचा- ‘भाई, बिना शर्ट के विंटर?’; सलमानच्या शर्टलेस फोटोवर चाहत्यांची मस्करी

पाचव्या सिझनची घोषणा

‘मनी हाइस्ट’ ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ही सर्वांत लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक आहे. स्वत:कडे गमावण्यासारखं काहीच नसलेल्या आठ जणांना एकत्र आणून ‘प्रोफेसर’ चोरीचा मोठा प्लान आखतो. मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या या सीरिजचे भाषांतर करून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर या सीरिजची लोकप्रियता तुफान वाढली. आता या सीरिजच्या पाचव्या सिझनची घोषणा करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:02 pm

Web Title: money heist inspector raquel murillo sings salman khan chunari chunari watch video dcp 98 ssv 92
Next Stories
1 ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर महेश टिळेकरांची टीका
2 Video : “सोशल मीडियावर असं बोलू नको”, बॉयफ्रेंड विकी जैनवर ओरडली अंकिता लोखंडे
3 ‘भाई, बिना शर्ट के विंटर?’; सलमानच्या शर्टलेस फोटोवर चाहत्यांची मस्करी
Just Now!
X