News Flash

प्रोफेसरच्या चोरीचा नवीन मामला; ‘मनी हाइस्ट’चा पाचवा सिझन लवकरच..

प्रोफेसर परत येतोय..

चोरीचा नवीन मामला घेऊन ‘मनी हाइस्ट’ या वेब सीरिजचा पाचवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ही सर्वांत लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक आहे. स्वत:कडे गमावण्यासारखं काहीच नसलेल्या आठ जणांना एकत्र आणून ‘प्रोफेसर’ चोरीचा मोठा प्लान आखतो. मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या या सीरिजचे भाषांतर करून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर या सीरिजची लोकप्रियता तुफान वाढली. आता पाचव्या सिझनची घोषणा करत यामध्ये ‘प्रोफेसर’ची भूमिका साकारणारा अभिनेता अल्वारो मोर्ते याने एक फोटो पोस्ट केला आहे.

या फोटोमध्ये तो मास्क लावलेला असून सेल्फी काढताना पाहायला मिळत आहे. ‘मी परत आलोय. प्रोफेसर परत आलाय’, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. ‘मनी हाइस्ट’चा चौथा सिझन अत्यंत निर्णायक वळणावर येऊन संपला होता. त्यामुळे पाचव्या सिझनची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. लॉकडाउनच्या काळात हा चौथा सिझन प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

ही सीरिज नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेण्डिंग सीरिजमध्ये आली होती. भारतातही या सीरिजचे प्रचंड चाहते आहेत. प्रोफेसरची भूमिका साकारणारा अभिनेता अल्वारो मोर्ते याच्याविषयी तरुणींमध्ये फार क्रेझ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 4:32 pm

Web Title: money heist season 5 alvaro morte announces the professor is back ssv 92
Next Stories
1 ….म्हणून सेटवर ‘इश्क सुभान अल्लाह’फेम अभिनेत्रीचे डोळे पाणावले
2 झाली रे झाली नऊ वर्षे झाली! जयकांत शिक्रे ‘सिंघम’च्या आठवणी जागवत म्हणाला…
3 छोट्या पडद्यावरील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला ओळखलं का?
Just Now!
X