नेटफ्लिक्सने काल रात्री बहुचर्चित क्राईम ड्रामा ‘मनी हाईस्ट’च्या ५ व्या सीजनचा ट्रेलर रिलीज केला आहे. या ११० सेकंदाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘मनी हाईस्ट’ या वेब सीरिजचा ५ वा दोन वेगवेगळ्या भागात रिलीज होणार असून येत्या ५ सप्टेंबर रोजी या सीजनचे पहिले ५ एपिसोड रिलीज होणार आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘मनी हाईस्ट’चे दोन टीझर रिलीज झाले होते. त्यानंतर आता या सीजनच्या ट्रेलरने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

‘मनी हाइस्ट’ ही एक स्पॅनिश वेब सीरिज असून इंग्लिश आणि हिंदीसह इतर भाषेत ही भारतीय प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘मनी हाईस्ट’च्या चौथ्या सीजनच्या शेवटी अलिसियाला प्रोफेसर कुठे लपून बसला आहे, ती जागा सापडते. त्यानंतर आता अलिसिया प्रोफेसर सोबत काय करणार? त्यांच्या सोबत सामील होणार? की प्रोफेसरला मारणार? असे बरेच तर्क प्रेक्षक लावताना दिसले होते. ‘मनी हाइस्ट’च्या ट्रेलरची सुरूवातीला अलिसिया प्रोफेसरचा सामना होतो. ती प्रोफेसरला “चेकमेट.” अस बोलून बेशुद्ध करते. नंतर एक आवाज  येतो. तो म्हणतो “शंभर तास झाले अडकलो आहोत, आत्ता आम्ही मारले जाणार.  या लढ्यात आम्ही एक चांगली मैत्रीण गमावली आहे. तर दुसरीकडे राकेल आख्या टोळीला निदर्शन देताना या ट्रेलरमध्ये दिसून आले आहे. हा ट्रेलरमध्ये शेवट कसा होतो याचा अंदाज लावता येत नाही. मात्र ट्रेलर पाहून हा अंदाज लावला जातो आहे की, आगामी सीजन नक्कीच उत्कंठावर्धक आहे.

‘मनी हाईस्ट’ ही सीरिज नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेण्डिंग सीरिजमधील एक आहे. भारतातही या सीरिजचे प्रचंड चाहते आहेत. प्रोफेसरची भूमिका साकारणारा अभिनेता अल्वारो मोर्ते याच्याविषयी तरुणींमध्ये फार क्रेझ आहे. या सीरिजचा चौथा सीजन गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर चाहत्यांमध्ये पाचव्या सीजन बाबत उत्सुकता होती. आता अखेर ‘मनी हाईस्ट’ सीरिजचा पाचवा सीजन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे.