News Flash

मॉरिशियस येथील “झाकरी” नृत्यप्रकार रुपेरी पडद्यावर झळकणार!!

गणेशोत्सव, शिमगा हे सण जवळ आले की आठवतात त्या आरत्या, बाल्या डान्स आणि जाकडी नृत्य. बाल्या डान्स आणि जाकडी नृत्य ही नावं आजच्या तरुणाईला तशी

| April 17, 2015 12:48 pm

गणेशोत्सव, शिमगा हे सण जवळ आले की आठवतात त्या आरत्या, बाल्या डान्स आणि जाकडी नृत्य. बाल्या डान्स आणि जाकडी नृत्य ही नावं आजच्या तरुणाईला तशी नवीनच आहेत. कोकणातील नामशेष होत जाणारा हा संस्कृती कलाप्रकार सातासमुद्रा पलीकडे असलेल्या मॉरिशियस येथे आजही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या कलाप्रकाराला मॉरिशियस येथे “झाकरी” असे संबोधले जाते.’स्विस एंन्टरटेण्मेंट’ची मराठीतील पहिलीच निर्मिती असलेल्या अजय फणसेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘चीटर’ या आगामी सिनेमात “झाकरी” हा नृत्य कलाप्रकार आपल्याला रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.
cheater450
फार वर्षांपूर्वी कोकणातील काही मंडळी ऊस तोडणीच्या कामासाठी मॉरिशियस येथे स्थलांतरित झाली. आपला हा पारंपारिक नृत्य कलाप्रकार त्यांनी तेथे ही आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सुरु ठेवला आणि चक्क आजही तेथे हा नृत्य कलाप्रकार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोकणात हा कलाप्रकार केवळ पुरुषमंडळी सादर करताना आपण पाहिले आहे परंतु मॉरिशियस येथे पुरुषांच्या बरोबरीने महिलाही हा कलाप्रकार सादर करतात.
cheater4501
अभिनेते हृषीकेश जोशी, वैभव तत्ववादी, अभिनेत्री आसावरी जोशी, सुहास जोशी आणि पूजा सावंत अशी या सिनेमाची स्टारकास्ट असून यांनी हा झाकरी नृत्य कलाप्रकार मोठ्या उत्साहाने या सिनेमात सादर केला आहे. सिनेमाच्या नावावरून आपल्याला या सिनेमाची कथा जरी लक्षात येत असली तरी त्यातील वेगळेपण जाणून घेण्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.   
अखिल जोशी यांनी या सिनेमातील चारही गाणी लिहिली असून अभिजित नार्वेकर यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. या सिनेमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी पहिल्यांदाच एकाच मराठी सिनेमासाठी दोन गाणी गायली आहेत. गायक अवधूत गुप्ते, गायिका उर्मिला धनगर, आनंदी जोशी यांच्या आवाजातही सिनेमातील अन्य गाणी रेकॉर्ड केली आहेत. या सिनेमातील झाकरी नृत्य कलाप्रकारासाठी नृत्यदिग्दर्शिका म्हणून वृषाली चव्हाण हिने काम पाहिले आहे.
मॉरिशियस येथे ७०% शुटींग पार पडलेला मराठीतील “चीटर” हा पहिलाच सिनेमा असून सध्या शेवटच्या टप्प्यातील शुटींग हे पुणे येथे सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2015 12:48 pm

Web Title: moraceous dance style zakari first time seen in marathi movies
Next Stories
1 ऑस्कर लायब्ररीत ‘बेबी’!
2 ‘गोडसे ट्रायल’ मोठय़ा पडद्यावर!
3 ओम पुरींचा पहिला मराठी चित्रपट
Just Now!
X