…म्हणून न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन नाकारला

सीबीआय आणि ईडीने सादर केलेल्या पुराव्यावरून महत्त्वाच्या भ्रष्टाचार प्रकरणात चिदंबरम हे मुख्य सूत्रधार आहेत.

आयएनएक्स मीडियाशी संबंधित भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी सीबीआयने अटक केली. दरम्यान, सीबीआयच्या एफआरआयमध्ये आपले नाव नसल्याचा दावा चिदंबरम यांच्याकडून केला जात आहे. पण, अटकपूर्व जामीन नाकारताना चिदंबरम हेच मुख्य सूत्रधार असून, प्रतिष्ठेचा विचार न करता गुन्हेगाराच सत्य मांडावे. जर आर्थिक गुन्ह्यातील आरोपीना अटकपूर्व जामीन दिला. तर साधारण घटनांप्रमाणेच या प्रकरणाचा तपासही वरवर केला जाईल, असे न्यायालयाने जामीन नाकारताना म्हटले आहे. वाचा सविस्तर…

राज ठाकरे आज ईडीच्या कार्यालयात; पोलिसांचा चोख बंदोबस्त

कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात मनसेकडून ठाणे बंदचे आवाहन करण्यात आले होते. तसेच अनेक कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयावर जाणार होते. परंतु राज ठाकरे यांच्या आदेशानंतर बंद मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबई तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाचा सविस्तर..

शासकीय मदत वाटपात नगरसेवकांचा प्रसिद्धीसाठी आटापिटा

गेल्या महिन्यात बदलापूर शहरात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर शासनाकडून आता त्यांना आर्थिक मदतीचे वाटप केले जात आहे. मात्र या वाटपाच्या कार्यक्रमात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना प्रसिद्धीचा हव्यास आहे. वाचा सविस्तर…

भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका : भारतीय संघाचे विजयी प्रारंभाचे ध्येय!

नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) : जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी भारताच्या अभियानाला गुरुवारपासून प्रारंभ करताना वेस्ट इंडिजविरुद्ध परिपूर्ण समन्वयासह विजयी सुरुवात करण्याचा निर्धार कर्णधार विराट कोहलीने केला आहे. वाचा सविस्तर…

सनी लिओनीची संपत्ती ऐकून व्हाल थक्क

पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या सनी लिओनीला यंदाचे वर्ष खऱ्या अर्थाने महत्वाचे ठरले आहे. गेल्या काही काळापासून सनी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत आहे. त्यातच तिच्या जीवनावर आधारित ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सनीचा जीवनप्रवास सर्वांसमोर आला. तिचा जीवनप्रवास पाहून तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली. हिच सर्वांची लाडकी सनी कोट्यावधींची मालकीण आहे. वाचा सविस्तर…