‘मोरूच्या मावशीनं माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थानं कलाटणी दिली. या नाटकानं माझा पूर्ण चेहरामोहराच बदलला’, विजू मामांनी अशा असंख्य आठवणी या नाटकाबद्दल जागवल्या. या नाटकाबद्दल जितकं बोलू तितकं कमीच ठरेल. त्यातलं ‘टांग टिंग टिंगाक्’ हे गाणं तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं होतं. “मोरूची मावशी’ साकारताना असे अनेक गंमतीशीर प्रसंग घडले. त्यातला लख्ख आठवणीत राहिलेला किस्सा काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका मुलाखतीत सांगितला.

मुलाचं लग्न पाहण्याची विजय चव्हाण यांची ही इच्छाही अपूर्णच

‘मोरुची मावशी’ नाटकाचे दौरे होते. यावेळी कलाकार आणि प्रेक्षक यांच्यासाठी एकच प्रसाधनगृह होतं. नाटक सुरू व्हायला काही अवधी बाकी होता. आता प्रेक्षक कदाचित आपापल्या जागेवर बसले असतील आणि प्रसाधनगृह रिकामी असेल असं मला वाटलं. मी स्त्री वेषात पुरुषांच्या प्रसाधनगृहामध्ये शिरलो. मात्र त्याचवेळी एक प्रेक्षक आत आला आणि मला पाहून गोंधळला. आपण चुकून पुरुषांऐवजी महिलांच्या प्रसाधनगृहामध्ये शिरलो असं त्याला वाटलं होतं. माफी मागून तो महिलांच्या प्रसाधनगृहामध्ये शिरला. पण तिथे गेल्यावर मात्र आणखी गोंधळ उडाला. मी स्त्रीवेशातला पुरुष कलाकार आहे त्यातून मी प्रसाधनगृहामध्ये  उभा आहे हेही त्यावेळी त्या प्रेक्षकाला सुधारलं नाही.’

VIDEO : ‘टांग टिंग टिंगाक्…’ म्हणणारी ‘मोरुची मावशी’ पाहाच

हा खूपच गंमतीशीर प्रसंग होता असं ते म्हणाले. ‘मोरुची मावशी’ नाटकासाठी आधी बेर्डे यांनाच विचारण्यात आले होते. मात्र इतर कामांमुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मोरूची मावशी करण्यास नकार दिला पण याच वेळी नाटकाचे दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांना विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. लक्ष्मीकांत यांनी सुचवलेली निवड विजय चव्हाण यांनी योग्य ठरवली. समोरून चालत आलेल्या संधीच त्यांनी सोनं करून दाखवलं.