27 November 2020

News Flash

Ridiculous! बॉलिवूड शब्दही हॉलिवूड शब्दावरुन चोरलाय, कंगनाचं पुन्हा टिकास्त्र

असल्या जगाला नाकारा असंही कंगनाचं आवाहन

Ridiculous! बॉलिवूड हा शब्दही हॉलिवूड या शब्दावरुन चोरला आहे.. ही बाब किती विचित्र आहे असं कंगना अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या नव्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या सिनेसृष्टीत अनेक ‘भांड’ म्हणजे वेळेला कुणाचीही नक्कल करुन आपला चरितार्थ चालवणारे लोक आहेत जे स्वतःला कलाकार म्हणवतात. एवढंच नाही तर आपल्याकडे भारतीय चित्रपटसृष्टीही आहे आणि आपल्याकडे बॉलिवूडही आहे. बॉलिवूड हा हॉलिवूड या शब्दावरुन चोरलेला शब्द आहे. अशा बॉलिवूडला खुलेपणाने नकार द्या असं आवाहन कंगनाने तिच्या नव्या ट्विटमध्ये केला आहे.

अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. अशात तिचं आणखी एक वक्तव्य समोर आलं आहे. ज्यामध्ये तिने बॉलिवूड या शब्दावर तर टीका केलीच आहे शिवाय इथल्या कलाकारांना भांड असंही संबोधलं आहे.

कालही केली होती टीका

“बॉलिवूडमधील सर्व लांडगे एकत्र येऊन वृत्तमाध्यमांवर हल्ला करण्याची तयारी करत आहेत. ज्यावेळी मजुरांवर, शेतकऱ्यांवर, स्त्रियांवर, गरीब जनतेवर अन्याय होतो त्यावेळी ही मंडळी कुठे असतात? हे लोक आज मानवाधिकाराच्या गप्पा मारत आहेत पण इतरांच्या हक्कांवर गदा येते तेव्हा गप्प बसतात.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला होता. यापूर्वी अशाच प्रकारची टीका दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री याने देखील केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 11:12 pm

Web Title: most ridiculous word bollywood itself copied and stolen from hollywood says kangana ranaut scj 81
टॅग Kangana Ranaut
Next Stories
1 सुशांत प्रकरणाची चौकशी CBI थांबवणार नाही; कारण…
2 प्रेग्नंसी दरम्यान करीनाने पूर्ण केलं ‘लालसिंग चड्ढा’चे चित्रीकरण
3 भानु अथ्थैया यांनी परत केला होता भारताचा ‘पहिला ऑस्कर’; कारण…
Just Now!
X