बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोक मतं मांडते. मात्र या सवयीमुळे अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. या ट्रोलिंगमुळे कंगना थोडी उदास झाली आहे. “प्रत्येक जण माझा विरोध का करतोय?” असा सवाल तिने आपल्या चाहत्यांना केला आहे.
अवश्य पाहा – “आंदोलनामुळे ७० हजार कोटींचं नुकसान होतंय”; कंगनाने केली शेतकऱ्यांवर टीका
“मी सिनेसृष्टीबाबत प्रामाणिक मतं मांडली त्यामुळे कलाकार मंडळी माझ्या विरोधात बोलू लागले. मी आरक्षणाविरोधात बोलले त्यामुळे सर्व हिंदू माझ्यावर टीका करु लागले. करणी सेनेने तर मणिकर्णिका या चित्रपटाच्या वेळी मला धमक्या दिल्या. मी मुस्लिमांना विरोध केला त्यामुळे ते माझ्यावर संतापले. अन् आता शीख देखील माझ्याविरोधात घोषणाबाजी करत आहेत. माझ्या प्रामाणिक भूमिकांमुळे कुठलाही राजकिय पक्ष माझं कौतुक करत नाही. या जगाच्या पलिकडे असं कुठलं जग आहे का? जिथे माझं कौतुक होईल.” अशा आशयाची दोन ट्विट्स करुन कंगनाने आपलं दु:ख व्यक्त केलं. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा – अरे बापरे… ही अभिनेत्री एका फोटोशूटसाठी घेते २०० कोटी
So now most Sikhs are against me, my well wishers tell me no political party likes a vote repellent like me, so clearly no political party appreciates me, most of you wonder why I do what I do. Well in a world beyond this world in the world of my CONSCIENCE I am appreciated
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 17, 2020
यापूर्वी कंगनाने दिलजीत दोसांजवर केली होती टीका
“दिलजीत आणि प्रियांका चोप्रा जे शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याचा आव आणत आहेत त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडावी. उगाच सरकारला विरोध करायचाय म्हणून टीका करु नये. दोघंही शेतकऱ्यांची माथी भडकवून गायब झाले आहेत. शेतकऱ्यांची अवस्था काय झाली आहे ते पाहा.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने दिलजीतवर निशाणा साधला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 18, 2020 4:23 pm