News Flash

mothers day 2020 : खास फोटो शेअर करत हेमामालिनींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

हेमामालिनी यांनी एक छानसं कॅप्शनही या फोटोला दिलं आहे

जगभरात आज मदर्स डे उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आईप्रतीचं प्रेम, तिच्या आठवणी शेअर केल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री हेमामालिनी यांनीदेखील त्यांच्या आईचा फोटो शेअर केला आहे. तसंच हा फोटो त्यांच्यासाठी मौल्यवान असल्याचं म्हटलं आहे.

हेमामालिनी यांनी शेअर केलेला फोटो जुना असून त्यांच्या एका डान्सच्या वेळी काढल्याचं दिसून येत आहे. यात त्यांनी आईला घट्ट मीठी मारली आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी एक छानसं कॅप्शन दिलं आहे. जया लक्ष्मी

आज मदर्स डे आहे. एक असा दिवस ज्यावेळी आपण आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देतो. तिचं प्रेम, तिचे कष्ट, मुलांचा सांभाळ करताना केलेली धावपळ या साऱ्यांच्या आठवणी पुन्हा एकदा जागवण्याचा दिवस. माझ्या आईसोबतचा माझा हा फोटो माझ्यासाठी फार मौल्यवान आहे, असं कॅप्शन हेमामालिनी यांनी दिलं आहे. तसंच या फोटोसोबत त्यांनी इशा देओल आणि अहाना देओलसोबतही काही फोटो शेअर केले आहेत. हे सगळे फोटो जुने असून इशा आणि अहानाच्या बालपणीचे आहेत.

दरम्यान, हेमा मालिनी यांच्या आईचं नाव जय लक्ष्मी चक्रवर्ती असं असून वडिलांचं नाव व्ही.एस.आर. चक्रवर्ती असं आहे. हेमा मालिनी यांचे वडील एक चित्रपट निर्माते होते. विशेष म्हणजे आज मदर्स डे असल्याच्या निमित्ताने हेमामालिनी यांनी त्यांच्या आईचा फोटो शेअर केला असून फार कमी जणांना त्यांच्या आईविषयी माहित आहे. हेमामालिनीप्रमाणेच कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्या आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तर काहींनी आईसाठी कविताही लिहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 3:23 pm

Web Title: mothers day 2020 hema malini shares pics with mom ssj 93
टॅग : Mothers Day
Next Stories
1 ‘विशाखापट्टणममध्ये संकटात सापडलेल्यांना मदत करा’; अभिनेत्याचं आवाहन
2 सलमान खानने मानले महाराष्ट्र पोलिसांचे आभार, कारण…
3 लॉकाडउनमुळे ‘नागिन ४’मधील या अभिनेत्रीला करावा लागतोय आर्थिक संकटाचा सामना
Just Now!
X