News Flash

mothers day 2020 : शिवानी सांगते, ‘माझी आई म्हणजे…’

पाहा, शिवानी काय म्हणते

१० मे हा मदर्स डे म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आज संपूर्ण जगभरामध्ये मदर्स डे उत्साहात साजरा केला जात आहे.आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास साजरा केला जातो. खरं तर आईची महती, तिचं प्रेम शब्दांमध्ये व्यक्त करता येणं शक्य नाही. मात्र तरीदेखील प्रत्येक जण त्यांना शक्य होईल त्या पद्धतीने आईप्रतीचं प्रेम, आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्येच मराठमोळी अभिनेत्री शिवानी बावकरनेदेखील तिच्या आईप्रतीच्या भावना व्यक्त केल्या आहे.


दरम्यान, ‘लागीरं झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या शिवानीने खास शब्दांमध्ये तिच्या आईप्रतीचं प्रेम व्यक्त केलं आहे. या व्हिडीओमधून शिवानीने तिची आई नेमकी तिच्यासाठी कशी आहे, ती दिवसभर शिवानीसाठी काय काय करते हे सांगितलं आहे. विशेष म्हणजे तिची आई शिवानीची चांगली मैत्रीण, सल्लागारदेखील असल्याचं शिवानीने आवर्जुन सांगितलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 9:44 am

Web Title: mothers day 2020 marathi actress shivani baokar share heartful message for mom ssj 93
टॅग : Mothers Day
Next Stories
1 Happy Mothers day 2020 : बिग बींपासून ते सारा अली खानपर्यंत सेलिब्रिटींनी असा साजरा केला ‘मदर्स डे’
2 भारतातील लोक ‘या’ अभिनेत्रीला दररोज करतात सर्च
3 “लॉकडाउन त्वरीत उठवा”; अभिनेत्याची सरकारकडे मागणी
Just Now!
X