14 December 2017

News Flash

Firangi motion poster: कपिलने ‘फिरंगी’ला मारली लाथ

कॉमेडियन कपिल शर्माचा आगामी चित्रपट ‘फिरंगी’चा मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कपिलने त्याच्या

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 12, 2017 6:33 PM

कपिल शर्मा

कॉमेडियन कपिल शर्माचा आगामी चित्रपट ‘फिरंगी’चा मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कपिलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हा मोशन पोस्टर शेअर केला आहे. हा कपिलचा दुसरा चित्रपट असून, राजीव ढिंगराने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये कपिलसोबत ईशिता दत्ता आणि मोनिका गिल झळकणार आहेत. इतकंच नाही तर नेहमी विनोदाची फटकेबाजी करणारा कपिल या चित्रपटात एक गाणंही गायला आहे.

या मोशन पोस्टरच्या सुरुवातीला ‘युके’चा झेंडा पाहायला मिळतोय. त्यानंतर पोलिसांच्या गणवेशातील कपिल त्यासमोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या पाठीत लाथ मारताना दिसतोय. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच पोस्टरलाही फिरंगी टच दिल्याचं पाहायला मिळत आहे. कपिलची यामध्ये काय भूमिका असेल आणि चित्रपटाची कथा काय असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे.

वाचा : १३ वर्षांनंतर ‘हा’ अभिनेता करतोय कमबॅक

टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’ बंद झाल्यानंतर तो या चित्रपटाच्याच कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. गेल्या काही दिवसांपासून तब्येत ठीक नसल्याने तो शोचं शूटिंगदेखील करू शकत नव्हता. अनेक सेलिब्रिटी शोमधून परतल्यानंतर वाहिनीने कपिल शर्माला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला.

२०१५ मध्ये कपिलचा पहिला चित्रपट ‘किस किस को प्यार करू’ प्रदर्शित झालेला. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर फारशी जादू करु शकला नव्हता. पण, ‘फिरंगी’कडून फक्त कपिललाच नाही तर प्रेक्षकांनाही बऱ्याच अपेक्षा आहेत.

First Published on October 12, 2017 6:33 pm

Web Title: motion poster of kapil sharma film firangi has been launched