मराठी सिनेमांचे, नाटकांचे आणि मालिकांचे आजच्या ‘टेक’ युगात ‘हाय टेक’ प्रमोशन झाले पाहिजे असे प्रत्येक मराठी युवाला  वाटत असते. मराठी युवाच्या ह्या भावना ओळखून स्टार प्रवाहने   त्यांच्या आगामी मालिकेचे असेच हाय टेक प्रमोशन सुरु केले आहे. स्टार प्रवाह वर श्रेयस तळपदे निर्मित ‘तुमचं आमचं सेम असतं’ हि मालिका लवकरच सुरु होत आहे. या मालिकेत अनेक कलाकार असल्याचे कळते आहे. एकंदरीतच मालिकेचा आवाका लक्षात घेता ह्या मालिकेचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन होणार ह्याची कल्पना येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ह्या मालिकेचे डिजिटल मोशन पोस्टर   स्टार प्रवाहने   प्रसिद्ध केले आहे. यामुळे अशा प्रकारे प्रमोशन करणारी स्टार प्रवाह पहिली मराठी वाहिनी ठरली आहे.
“आजवर स्टार प्रवाह ने मालिकांच्या प्रमोशनसाठी अनेक अनोखे मार्ग अवलंबले आहेत. जशी प्रत्येक कथा हि वेगळी असते, त्याप्रमाणे ती प्रमोट करण्याचे मार्गही वेगळे असायला हवे” असे मत स्टार इंडियाच्या प्रवक्त्यांनी या निमित्त व्यक्त केले आहे. तसेच केवळ एका पोस्टरवर आम्ही थांबणार नसून डिजिटल पोस्टरची, मालिकेतील वेगवेगळ्या पात्रांना घेऊन त्यांच्या-त्यांच्या दृष्टीकोनातून कथेचा विषय मांडणारी सिरीजच येत्या काही आठवड्यात आम्ही   प्रसिध्द करणार आहोत असेही त्यांनी नमूद केले.
आता नेमके हे डिजिटल मोशन पोस्टर आहे तरी काय त्यासाठी हा व्हिडिओ बघा: