News Flash

‘मोटू पतलू’चा मराठमोळा अंदाज

आज प्रत्येक लहान मुलाच्या तोंडात मोटू पतलू या कॅरेक्टर्स ची नावे रेंगाळताना दिसत आहेत

पाश्चिमात्य अॅनिमेशन तंत्रज्ञान आणि सिनेमा यांच्या तुलनेत काहीसे एक पाऊल मागे असणाऱ्या भारतीय सिनेक्षेत्रात उत्तरोत्तर बदल घडून येत आहेत. याच अॅनिमेशन सिनेमांच्या क्षेत्रात तब्बल १६ वर्ष कार्यरत असणाऱ्या सुहास दत्तात्रय कडव यांचं नाव सध्या फारच चर्चेत आहे. भारतीय तंत्रज्ञान आणि भारतीय समाजाशी भावनिक ऋणानुबंध जोडणारी ‘मोटू पतलू’ हे कार्टून्स त्यांनी जगासमोर आणले आहे.

विविधतेने नटलेल्या भारतीय मूल्यांचा आणि भावनिकतेचा समावेश त्यांच्या या कलाकृतीत दिसून येतो. मुळतः महाराष्ट्रातील साताऱ्याचे असणारे सुहास कडव यांनी ‘मोटू पतलू’ या सिरीजद्वारे भारतातील अनेक होतकरू तरुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
विशेष म्हणजे, एका मराठी तरुणाने उचललेले हे पाऊल खरेच कौतुकास्पद आहे. ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमातून त्यांनी सादर केलेली ही कलाकृती भारतीय मनोरंजन क्षेत्रात अॅनिमेशन कार्टून सिरीज तसेच फिल्ममध्ये क्रांती आणणारी ठरणार आहे. भारतीय अॅनिमेशन क्षेत्रात सध्या विकासाचे वारे वाहताना दिसत आहे. या वाऱ्यांमुळे भारताचे अॅनिमेशन तंत्रज्ञान सातासमुद्रापार राज्य करेल असे भाकीत देखील वर्तवले जात आहे. हे सारे सुहास कडव यांमुळे शक्य झाले. अॅनिमेशन कार्टून्सना भविष्यात भारतात सुगीचे दिवस येतील असा त्यांचा विश्वास होता. त्यांचा हाच विश्वास ‘मोटू पतलू’ या कॅरेक्टर्स मार्फत पूर्ण झाला.

भारतातील रंगसंगती, विविध धर्म, वंश आणि भाषेतून उदयास आलेली संस्कृती आपल्या कलेतून त्यांनी साकार केली. त्यासाठी ‘मोटू पतलू’ या केरेकटर्सना घेऊन त्यांनी एक भन्नाट उपक्रम प्रेक्षकांसमोर आणला. भारतीय पाकात घोळलेला हा उपक्रम मेड इन इंडिया आहे. विशेष म्हणजे, मराठी तरुणांना घेऊन मुंबईत भारतीय तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘मोटू पतलू’ हे कार्टून्स सादर करण्यात आले.

लहान मुलांना वेडावून सोडणाऱ्या मोटू आणि पतलू या कार्टून्सना बच्चेकंपनीत मोठी प्रसिद्धी मिळत आहे. पाश्चिमात्य देशातील कार्टून्स केरेक्टर्सची भारतात वाढणारी क्रेज लक्षात घेता सुहास कडव यांच्या ‘मोटू पतलू’ला देखील मोठी पसंती मिळत आहे. विदेशी केरेक्टर पेक्षा भारतीय केरेक्टरची निर्मिती करण्याचे मोठे धाडस सुहास कडव यांनी या मालिकेच्या माध्यमातून केले होते. त्यामुळे ‘मोटू पतलू’चे हे श्रेय आणि भारतीयत्वाचे ब्रीद मोठ्या पडद्यावर साकारण्याचे धाडस आपण केले असल्याचे सुहास सांगतात.

आज प्रत्येक लहान मुलाच्या तोंडात मोटू पतलू या कॅरेक्टर्स ची नावे रेंगाळताना दिसत आहेत. विदेशातील गाजलेल्या कार्टून्स कॅरेक्टर्सना, सर्वाधिक पसंतीच्या यादीत भारताच्या ‘मोटू पतलू’ ने केव्हाच मागे सोडले आहे. भारतीय मुलांच्या भावविश्वाचा आणि मानसिकतेचा आढावा त्यांच्या या कलाकृतीत दिसून येतो. याबद्दल सांगताना सुहास यांनी आपल्या लहान मुलाचे बारीक निरीक्षण केले असल्याचे ते सांगतात, त्याचे हसणे बोलणे तसेच त्याची विचार करण्याची पद्धत या साऱ्यांचे बारीक निरीक्षण करून सुहास यांनी ‘मोटू पतलू’ मध्ये रंग भरला आहे. अशा या लहान मुलांच्या विश्वात रंगलेल्या ‘मोटू पतलू ‘च्या मराठमोळ्या अंदाजाचे जितके कौतुक करता येईल तितके थोडेच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 2:08 pm

Web Title: motu patlus marathi connection
Next Stories
1 बाबा सेहगलची ऐकायलाच हवी अशी मजेशीर ‘टर-टर-टर’
2 Big Boss 10:’बिग बॉस’च्या घरात दिसणार नोएडाचा दुधवाला..
3 VIDEO: ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये फवाद खान ऐवजी गजेंद्र चौहान यांची एन्ट्री
Just Now!
X