05 December 2020

News Flash

मौनी रॉयने केला साखरपुडा? वाचा नेमकं काय आहे प्रकरण

पाहा, मौनीने शेअर केलेला एन्गेंजमेंट रिंगचा फोटो

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या अभिनेत्री मौनी रॉयची चाहत्यांमध्ये कायमच चर्चा असते. मौनी अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अलिकडेच मौनीने एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात अंगठी दिसत असून मौनीने साखरपुडा केला की काय असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या मौनीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात डायमंड रिंग दिसत आहे. त्यामुळे मौनीने गुपचूप साखरपुडा केला अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.

मौनीने शेअर केलेला फोटो तिच्या साखरपुड्याचा नसून एका ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी तिने तो फोटो शेअर केल्याचं दिसून येत आहे. याविषयी तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये तसा उल्लेखदेखील केला आहे.

दरम्यान, छोटा पडदा गाजवल्यानंतर मौनीने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. लवकरच ती ब्रह्मास्त्र या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर बिग बीदेखील या चित्रपटात दिसणार आहेत. यापूर्वी मौनी गोल्ड आणि मेड इन चायना या चित्रपटांमध्ये झळकली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 11:16 am

Web Title: mouni roy flaunts her diamond ring and shared her photo and fans asked her about engagement ssj 93
Next Stories
1 Video: मलायका अरोराने ‘तारक मेहता’मधील डॉक्टर हाथीसोबत केला डान्स
2 Video : पाहा, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘द व्हाइट टायगर’चा ट्रेलर
3 त्या रात्री नेमकं काय घडलं? हल्ल्यानंतर अभिनेत्री मालवीने केला धक्कादायक खुलासा
Just Now!
X