25 February 2021

News Flash

लॉकडाउनमध्ये प्रवास करणाऱ्या मौनीने केली ‘ही’ चूक; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

मौनी रॉयचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील व्हाल चकित

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मादक फोटो, व्हिडीओज, ट्विट्स, ऑनलाईन ब्लॉग्स यांच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाते. यावेळी मौनी करोना फेस शिल्डमुळे चर्चेत आहे. तिने फेस शिल्ड लावून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र या व्हिडीओमध्ये तिने एक चूक केली आहे. या चूकीमुळे नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.

अवश्य पाहा – छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केतकीला दिग्दर्शकाने सुनावले खडेबोल

 

View this post on Instagram

 

Tata

A post shared by mon (@imouniroy) on

अवश्य पाहा – टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का?; बॉलिवूड गायकाचा केंद्राला सवाल

मौनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर तिने विमानाचं चिन्ह दाखवून ‘टाटा’ असं कॅप्शन लिहिलं आहे. या कॅप्शनमुळे ती प्रवास करत असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओमधील लक्षवेधी बाब म्हणजे तिने फेस शिल्ड व मास्क लावलं आहे. मात्र यामुळेच तिची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. कारण तिने मास्क नाकावर लावले नाही. त्यामुळे “मास्क नाकावर देखील लाव” असं म्हणत तिला चिडवलं जात आहे. मौनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

करोना विषाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. दर तासांला एक हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण देशात आढळून येत आहेत. देशात गेल्या चार दिवसांत एक लाख नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाख्यांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. देशात दोन लाख ८३ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत पाच लाख १५ हजार ३८६ रुग्ण बरे झाले आहेत. मागील २४ तासांत ५१९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 5:44 pm

Web Title: mouni roy funny videos goes viral mppg 94
Next Stories
1 ‘डॉक्टर डॉन’ची करोना योद्धयांना मदत!
2 टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का?; बॉलिवूड गायकाचा केंद्राला सवाल
3 ‘कसौटी जिंदगी की २’मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याला झाला करोना
Just Now!
X