संपूर्ण देशात करोना व्हायरसने थैमान घातला आहे. अशातच अभिनेत्री मौनी रॉय लंडन, मालदीव आणि यूएई फिरताना दिसत होती. मौनी मार्च महिन्यात बहिणीकडे यूएईत गेली होती. त्याच दरम्यान भारतात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ती चित्रीकरणा निमित्त लंडनला गेली आणि नंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेली होती. दरम्यान मौनीने सात वेळा करोना चाचणी करुन घेतली होती.

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये मौनीने लॉकडाउनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या याचा खुलासा केला आहे. तिने बहिणीसोबत पेटिंग काढण्याचा प्रयत्न केला. तसेच वेगवेगळे पदार्थ बनवले. आई बनवत असलेले काही खास पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा केला.

 

View this post on Instagram

 

What did the water tell the ledge? : you jump, I am chill

A post shared by mon (@imouniroy) on

त्यानंतर मौनीला एका वेब शोच्या चित्रीकरणासाठी लंडनला जावे लागले. तेथे करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कशी काळजी घेतली जात होती याबाबत मौनीने वक्तव्य केले. ‘त्यावेळी चित्रीकरणाच्या वेळी जे काही नियम आखण्यात आले ते सर्वजण पाळत होते. आम्हाला कमी वेळात या सर्व गोष्टींची सवय झाली होती. तसेच चित्रीकरणाच्या वेळी प्रत्येक आठवड्यामध्ये प्रत्येकाची स्वॅब टेस्ट केली जायची’ असे मौनी म्हणाली.

चित्रीकरण संपल्यानंतर मौनी तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेली होती. तेथे पोहोचताच डॉक्टर करोना चाचणी करतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचे रिपोर्ट येतात. तुमची करोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर तुम्हाला समुद्र किनारी मास्क न लावता फिरण्याची परवानगी मिळते असे मौनीने सांगितले. पुढे ती म्हणाली गेल्या ७ महिन्यांमध्ये ७ वेळा करोना चाचणी करुन घेतली आहे. करताना थोडा त्रास होतो पण ती चाचणी करुन घेणे गरजेचे आहे.