News Flash

‘बिग बॉस १०’ मध्ये करावा लागणार एकमेकांचा सामना

'बिग बॉस १०' मध्ये करावा लागणार एकमेकांचा सामना

बिग बॉस १०

‘बिग बॉस’ घरात नेहमीच काही ना काही नवीन घडत असते. पण आता असे काही घडणार आहे, जे पाहून सगळ्यांच्याच भूवया उंचावतील. टीव्हीची सेक्सी नागीण अशी ओळख असलेली अभिनेत्री मौनी रॉय आता तिच्या पूर्व प्रियकर गौरव चोप्राच्या समोर येणार आहे. शोच्या विकेण्ड स्पेशलमध्ये मौनी तिची मालिका ‘नागिन २’ चे प्रमोशन करायला येणार आहे.

गोरव चोप्रा आणि मौनी काही वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी एका डान्स रिअॅटिल शोमध्येही भाग घेतला होता. त्यानंतर मौनी महादेव फेम मोहित रैना याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. गौरव ‘बिग बॉस’च्या घरी सध्या सगळ्यात जास्त नावाजलेला स्पर्धक आहे. मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यावेळचे काही फोटोही शेअर केले आहेत. यातल्या एका फोटोमध्ये ती सलमान खानसोबत दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 6:32 pm

Web Title: mouni roy to face ex boyfriend gaurav chopra in bigg boss
Next Stories
1 जॉन आणि सोनाक्षीच्या ‘फोर्स २’वरही चलनसंकट
2 अखेर पॅरिस हल्ल्यावर बोलली मल्लिका शेरावत
3 आर्किटेक्ट बनण्याचे स्वप्न पाहणऱ्या ऐश्वर्याने अशा प्रकारे ठेवले ग्लॅमर जगतात पाऊल..
Just Now!
X