‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील हस्तमैथुन करतानाचं दृश्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. यामुळे अभिनेत्री स्वरा भास्करवर सोशल मीडियावर टीकेचा भडिमार करण्यात आला होता. हा वाद शमत नाही तोच आणखी एका वेब सीरिजमधलं अभिनेत्री कियारा अडवाणी आणि नेहा धुपियाचं हस्तमैथुन करतानाचं दृश्य चर्चेत आलं आहे.

चार वेगवेगळ्या कथा घेऊन ‘लस्ट स्टोरीज’ या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली. स्त्रियांच्या इच्छा, अपेक्षा आणि कामुकता याविषयी या वेब सीरिजमध्ये भाष्य करण्यात आलं आहे. एकीकडे यातील राधिका आपटे, कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर या अभिनेत्रींच्या अभिनय कौशल्याची प्रशंसा होत असतानाच दुसरीकडे यातील बोल्ड दृश्यांचीही चर्चा होऊ लागली आहे.

Video : ..अन् चालता चालता काजोल पडली

या विषयावर बोलणं गरजेचं आहे आणि चित्रपटांच्या माध्यमातून ही गोष्ट पुढे येत आहे तर त्यात चुकीचं काय असं मत कियाराने मांडलं आहे. मात्र आता या दृश्यांवरून कियारा आणि नेहावरही टीकेचा भडीमार होणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जोया अख्तर, करण जोहर, अनुराग कश्यप आणि दिबाकर बॅनर्जी या दिग्दर्शकांनी चार स्त्रियांच्या कथा या वेब सीरिजमध्ये मांडल्या आहेत. १५ जून रोजी नेटफ्लिक्सवर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या चारही स्टोरीजमध्ये राधिका आपटे, भूमी पेडणेकर, मनीषा कोइराला आणि कियारा अडवाणी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. प्रेम आणि नातेसंबंधांना मॉर्डन टच देऊन या वेब सीरिजमध्ये चित्रीत करण्यात आले आहे.