News Flash

कॅन्सरविषयीच्या ‘त्या’ ट्विटचा लकी अलीने केला खुलासा

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट करत आपल्याला कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं होतं.

लकी अली, lucky ali

‘शाम सवेरे तेरी यादे आती है…’ या आणि अशा अनेक इंडिपॉप गाण्यांना आपल्या मखमली आवाजात सादर करणाऱ्या गायक लकी अलीच्या ट्विटने सर्वांचच लक्ष वेधलं होतं. किमोथेरेपीशी संबंधित एक ट्विट करत त्याने एका अर्थी चाहत्यांच्या जिवाला घोर लावला होता. लकीचं ते ट्विट पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याच्याविषयी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली.

आपल्याविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा पाहता लकीने फेसबुकवर एक पोस्ट करत काही गोष्टी स्पष्ट केल्या. चाहत्यांचे आभार मानत त्याने या पोस्टमध्ये लिहिलं, ‘देवाच्या कृपेने माझी प्रकृती अतिशय उत्तम आहे. तुम्ही माझ्यावर केलेलं प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. त्यासाठी मी तुमचे खूप आभार मानतो. मी त्या तरुण वर्गासाठी हे ट्विट केलं होतं जे किमोथेरेपीचा सामना करत आहेत. ते कोणा एका व्यक्तीसाठी किंवा माझ्यासाठी केलं गेलेलं ट्विट नव्हतं.’

वाचा : हाय ग्रेड कॅन्सरसाठी सोनालीची ‘ही’ चूक पडली महागात

लकीची ही फेसबुक पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट करत आपल्याला कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं होतं. या आजाराचं वाढतं प्रमाम पाहता गेल्या काही दिवसांपासून जनसामान्यांमध्येही त्याविषयी चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 11:30 am

Web Title: movie actor singer actor lucky ali rubbishes rumors of suffering from cancer with a facebook post
Next Stories
1 सुहास जोशींचं छोट्या पडद्यावर पुनरागमन
2 Bigg Boss Marathi : मेघाला का मानलं जातं विजेतेपदाची प्रमुख दावेदार?
3 फ्लॅशबॅक : गोष्ट ओळखीची वाटते का बघा…
Just Now!
X