25 October 2020

News Flash

PHOTO : चाहत्यांच्या मनावर पुन्हा राज्य करण्यास प्रभास सज्ज

त्याच्या आगामी चित्रपटाविषयीची बरीच माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

प्रभास

दाक्षिणात्य चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्रभासच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटातील भुमिकेमुळे तर त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. मुख्य म्हणजे या चित्रपटामुळे फक्त दक्षिण भारतातच नव्हे तर, विविध भाषी प्रेक्षकांमध्येसुद्धा त्याचे वेड पाहायला मिळाले. प्रभासच्या नुसत्या स्मितहास्यावर कित्येक तरुणींचं भानही हरपलं. असा हा अभिनेता पुन्हा एकदा त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे. ‘जीक्यू’ मासिकाच्या जानेवारी महिन्यातील आवृत्तीच्या मुखपृष्ठावर प्रभासचा हा लूक पाहायला मिळतो आहे.

फेसबुक अकाऊंटवरुन हा लूक शेअक करत त्याने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. प्रभासने शेअर केलेला हा फोटो पाहून पुन्हा एकदा त्याच्यावरच अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत, असे म्हणायला हरकत नाही. प्रभास सध्या त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. अबू धाबीमध्ये ‘साहो’चं चित्रीकरण सुरु असून, या चित्रपटाविषयीची बरीच माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी अनेकांमध्येच कुतूहल पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘साहो’मधून झळकणार आहे. प्रभास आणि श्रद्धा पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार असल्यामुळे या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. श्रद्धाशिवाय अभिनेता नील नितीन मुकेशसुद्धा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा : ‘साहो’मधील श्रद्धाच्या भुमिकेबद्दल प्रभास म्हणतो…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 7:40 pm

Web Title: movie baahubali fame actor prabhas suave look see photo saho
Next Stories
1 PHOTO : नववर्षाच्या शुभेच्छा देताना ‘विरूष्का’चा सेल्फी मूड
2 PHOTO : नव्या वर्षात सईचा बोल्ड अंदाज
3 नववर्षात किंग खानची चाहत्यांना अनोखी भेट
Just Now!
X