27 February 2021

News Flash

महेश मांजरेकर यांची लेक सलमानच्या ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांच्या मुलीचं. मांजरेकर यांची मुलगी अश्वमीसुद्धा कलाविश्वाची वाट धरण्यास सज्ज झाली आहे.

महेश मांजरेकर, अश्वमी मांजरेकर

कलाविश्वात कलाकारांचा वारसा चालवण्यासाठी त्यांची मुलं नेहमीच पुढे असतात. यातच आता आणखी एक नाव जोडलं जाण्याची चिन्हं आहेत. ते नाव म्हणजे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांच्या मुलीचं. मांजरेकर यांची मुलगी अश्वमीसुद्धा कलाविश्वाची वाट धरण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे मांजरेकरांचं पूर्ण कुटुंबच या कलाजगतात योगदान देतंय असं म्हणायला हरकत नाही.

‘पिंकव्हिला’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दबंग खान, म्हणजेच अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘दबंग ३’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘दबंग’ चित्रपटाच्या सीरिजमधील पुढचा भाग असणाऱ्या ‘दबंग ३’ या चित्रपटासाठी टेलिव्हिजन अभिनेत्री मौनी रॉय हिच्यासोबतच अश्वमीचीही वर्णी लागल्याचं कळत आहे. बी- टाऊनमधील चुलबूल पांडेच्या चित्रपटातून नव्या प्रवासाची सुरुवात करण्याची संधी मिळणं ही अश्वमीसाठीसुद्धा महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे.

वाचा : ऑलिम्पिक पदकाचा वेध घेण्याचे स्वप्न!

‘दबंग ३’शी अश्वमीचं नाव जोडलं जात असलं तरीही त्याविषयी कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तेव्हा आता अनेकांचच लक्ष भाईजान सलमानच्या या आगामी चित्रपटाकडे लागून राहिलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या अखेरीस या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवाता होणार आहे. ज्याच्या दिग्दर्शनाची धुरा प्रभुदेवाने आपल्या खांद्यावर घेतल्याचं कळत आहे. ‘दबंग ३’पूर्वी सलमान ‘रेस ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

VIDEO : अशी होती प्रवासवेड्या मित्राची अनोखी विश्वभ्रमंती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 12:48 pm

Web Title: movie dabangg 3 director producer mahesh manjrekars daughter to make her bollywood debut in the actor salman khan actress sonakshi sinha film
Next Stories
1 Bigg Boss Marathi: पहिली विकेट आरती सोलंकीची!
2 महेश बाबूचा हा चित्रपट ठरतोय सुपरहिट; दोन दिवसांत जमवला १०० कोटींचा गल्ला
3 शिल्पा शिंदेकडून पॉर्न व्हिडिओ शेअर, हिना खानने सुनावले खडेबोल
Just Now!
X