News Flash

VIDEO : ‘मासिक पाळी एक व्यक्ती असती तर…’

तर नेमकं काय झालं असतं हेच या व्हिडिओमधून दाखवण्यात आलं आहे.

छाया सौजन्य- फेबसुक / अक्षय कुमार

अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे सध्या त्यांच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असून शक्य त्या सर्व मार्गांनी ते हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच प्रसिद्धी सत्रामध्ये गुंतलेल्या अक्षयने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये अक्षय चक्क एका मासिक पाळीची भूमिका साकारताना दिसतोय. मासिक पाळी व्यक्ती असती तर नेमकं काय झालं असतं हेच या व्हिडिओमधून दाखवण्यात आलं आहे.

‘मिस मालिनी’ या वेबसाईटसाठी चित्रीत करण्यात आलेल्या या व्हिडिओशी अनेकजणी स्वत:ला जोडू शकतात. कारण मासिक पाळीदरम्यान स्वभावात, रोजच्या व्यवहारात होणारे बदल आणि एकंदरच ‘त्या’ दिवसांमध्ये एखाद्या तरुणीची, मुलीची किंवा महिलेची नेमकी मनस्थिती कशी असते हेच या व्हिडिओतून प्रत्यकारीपणे दाखवण्यात आले आहे.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून अरुणाचलम मुरुगानंदम् या महत्त्वाकांक्षी व्यक्तीची यशोगाथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यासोबतच मासिक पाळी आणि महिलांचे आरोग्य, ‘त्या’ पाच दिवसांमध्ये महिलांना होणारा त्रास आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या अडचणी या मुद्द्यांवरही भाष्य करण्यात आले आहे. आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री ट्विंकल खन्नाने चित्रपट निर्मिती क्षेत्रात उडी घेतली आहे. तेव्हा आता अपेक्षांचं ओझं असतानाही महत्त्वाकांक्षी स्वप्नांची साथ न सोडणारा ‘पॅडमॅन’ प्रेक्षकांना भावणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 12:51 pm

Web Title: movie padman fame bollywood actor akshay kumar shares a video where plays role of period sonam kapoor
Next Stories
1 VIDEO : अक्षय म्हणतोय, ‘पिरियड्स के दाग अच्छे है’
2 नागराजच्या ‘झुंड’साठी बिग बी सज्ज
3 कसला भारीये हा! विराटच्या शतकी खेळीवर अनुष्काची कमेंट
Just Now!
X