News Flash

VIDEO : अतिउत्साही चाहत्याला ‘या’ अभिनेत्याने लगावली चपराक

सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल

बालाकृष्ण

चाहत्यांच्या अतिउत्साहीपणामुळे कधीकधी कलाकारांचा राग विकोपास जातो हे आपण अनेकदा पाहिलं असेल. दाक्षिणात्य अभिनेता नंदकुमारी बालाकृष्ण यालाही अशाच काही अतिउत्साही  चाहत्यांचा सामना करावा लागला. त्यानंतर राग अनावर झाल्यामुळे बालाकृष्णने त्या चाहत्याला चपराक लगावली. त्यामुळे नेहमीच आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असणारा हा अभिनेता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.

सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या अनेकांचेच लक्ष वेधत असून, आगामी पोटनिवडणुकांसाठी बालाकृष्ण नंदयालमध्ये आले असतानाच हा सर्व प्रकार घडला. आपल्यासमोर आलेला जमाव पाहून गोंधळल्यामुळे त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने समोर उभ्या असलेल्या चाहत्याच्या कानशिलात लगावली. इतकच नव्हे तर त्याने नंतर त्या चाहत्याला डोळ्यांचा धाकही दिला.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

बालाकृष्ण अशा प्रकारे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने इतरांना चुकीची वागणूक दिल्याचं पाहायला मिळालं होतं. आपल्यासोबत वावरत असलेल्या व्यक्तींनाही बालाकृष्ण चांगली वागणूक देत नाहीत हे काही व्हिडिओंमधून पाहायला मिळालं होतं.
राजकारणात सक्रिय असलेला हा अभिनेता सध्याच्या घडीला के.एस. रविकुमार यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असून, रामोजी फिल्मसिटीमध्ये याचं चित्रीकरण सुरु आहे. सी. कल्याण याची निर्मिती असलेल्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री नयनतारासुद्धा झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याशिवाय अभिनेता प्रकाश राज आणि जगपती बाबूसुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 4:37 pm

Web Title: movie paisa vasool actor nandamuri balakrishna slaps an over excited fan video goes viral
Next Stories
1 प्रेमासाठी ‘या’ अभिनेत्रीने सोडलेली चित्रपटसृष्टी
2 हातात एकही चित्रपट नसताना करिष्मा कमवते कोट्यवधी रुपये!
3 ‘हे बेबी’मधील ‘ऐंजल’ आठवते का?
Just Now!
X