14 August 2020

News Flash

चित्र रंजन : वाईटातून चांगल्याची अनुभूती..!

खूप वर्षांनी मिळालेला हा कश्यप शैलीतला चित्रपटानुभव रंजकही आहे आणि काही एक भाष्य करू पाहणाराही आहे.

रेश्मा राईकवार reshma raikwar@expressindia.com

‘चोक्ड – पैसा बोलता है’

नावातच सगळे रोखठोक सांगून मोकळा होणारा अनुराग कश्यपसारखा दिग्दर्शक विरळा. ‘चोक्ड -पैसा बोलता है’ हा चित्रपट पाहिल्यावर या रोखठोकपणाची प्रचीती येते. दोन गोष्टींसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. एक म्हणजे चार वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या ज्या निर्णयाने लोकांचे अक्षरश: जीव गुदमरले होते त्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या परिणामांविषयी हा चित्रपट बोलतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप काळानंतर शहरी मध्यमवर्गीय त्याहीपेक्षा मुंबईतल्या मध्यमवर्गीयांच्या जीवनात डोकावून त्यांचा कोंडमारा करणाऱ्या या गोष्टींचा उपहासात्मक समाचार या चित्रपटात घेतला आहे. वाईटातूनही चांगल्याची अनुभूती येते, मात्र त्यासाठी अनपेक्षित संधीचा लाभ घेतानाही वाईटाची मात्रा चांगुलपणावर भारी पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे हे सांगणारा अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘चोक्ड’ हा टाळेबंदीत मिळालेला मोकळा श्वास आहे.

तीन खणांच्या जुन्या सुटसुटीत इमारतीत भाडय़ाने राहणारे त्रिकोणी कु टुंब. नवरा-बायको आणि मुलगा या त्रिकोणातला एकच कोन

कुटुंबाला सावरून धरतो आहे तो सरिताचा(सयामी खेर). कधीतरी सुंदर गाणाऱ्या सरिताचा आवाजच अडकला आहे. कु ठल्यातरी रिअ‍ॅलिटी शोमध्ये गाणे गात असताना घाबरलेली सरिता त्यानंतर त्या क्षेत्रातूनच बाहेर फे कली जाते. त्याच शोमध्ये तिची गिटारवर साथसंगत करणारा सुशांत (जॉन मॅथ्यू) हा आज तिचा जोडीदार आहे. दोघांनाही आपापल्या क्षेत्रात आलेले अपयश आणि त्यामुळे संसाराचा लागलेला विसंवादी सूर या कथेच्या मुळाशी आहे. सरिता सरकारी बँके त नोकरी करते आहे, मात्र दिवसा बँके त यंत्रवत नोटा मोजायच्या आणि घरी आल्यावर त्याच पैशांच्या हजार तगाद्यांपायी झाकोळून टाकणारे नैराश्य हा तिच्या आयुष्यातला विरोधाभास दिग्दर्शकाने अस्सल रंगवला आहे. कु ठल्याही घरात तुंबणारे पाणी आणि त्यामुळे खालच्या घराच्या छताला येणारी ओल आणि त्यातून होणारे वाद ही सर्वसामान्य गोष्ट. मात्र याच गोष्टीमुळे सरिताच्या एकसुरी जगण्याला कलाटणी मिळते. तिच्या गुदमरणाऱ्या जीवाला दिलासा मिळतो. अर्थात, हा दिलासा किती खरा आणि किती खोटा? इथपासून ते कोंडी झाली आहे हे लक्षात आल्यावर त्यातून मार्ग शोधणारा सरिताचा सरळमार्गी नवरा सुशांत आणि वरकरणी सरळसाधे भासणारे, परिस्थितीचा अचूक फायदा उठवणारे लोक असे अनेक पदर यात दिग्दर्शकाने घट्ट गुंफले आहेत.

देशातला सगळा काळा पैसा धुऊन निघावा आणि स्वच्छ प्रतिमा उभी राहावी यासाठी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयाने ज्यांनी सरळमार्गी पैसे कमावले होते त्यांचेही धुऊन निघालेले आयुष्य, जे सरकारी कर्मचारी या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेतील घटक होते. त्यांना जाणवलेले सत्य आणि तरीही त्याच यांत्रिकपणाने त्यांनी पांघरलेला हतबलतेचा बुरखा यावरही दिग्दर्शकाने बोट ठेवले आहे. पण म्हणून हा चित्रपट पूर्णपणे नोटाबंदीवर भाष्य करणारा चित्रपट आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. या एका निर्णयाचा आधार घेत त्यानंतर झालेल्या उलथापालथींना सामोरे जात दिसलेल्या अनेक वृत्ती-प्रवृत्ती आणि त्यांच्या रोजच्या जगण्यातले वास्तव याची हलक्याफु लक्या पद्धतीची प्रभावी मांडणी दिग्दर्शक अनुराग कश्यपने के ली आहे. याचे श्रेय खरे म्हणजे लेखक निहित भावे यांनाही द्यायला हवे. या प्रभावी कथेला सयामी खेर, जॉन मॅथ्यू या मुख्य जोडीसह सगळ्याच कलाकारांची उत्तम साथ मिळाली आहे. अमृता सुभाषने साकारलेल्या ताईचा विशेष उल्लेख करायला हवा. इथेही तिने सख्ख्या शेजारणीची भूमिका वठवणारी ताई वेगळी संवादफे क आणि देहबोलीसह उभी के ली आहे. उपेंद्र लिमये, तुषार दळवी यांचाही वावर मराठी मनांना प्रसन्न करणारा असला तरी त्यांच्या भूमिका मर्यादित आहेत. खूप वर्षांनी मिळालेला हा कश्यप शैलीतला चित्रपटानुभव रंजकही आहे आणि काही एक भाष्य करू पाहणाराही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 2:20 am

Web Title: movie review of choked paisa bolta hai zws 70
Next Stories
1 नमस्ते देवियो और सज्जनो… ‘गुगल मॅप’वर आता अमिताभ सांगणार रस्ता
2 दिवाळीमध्ये सलमान आणि अक्षय येणार आमने सामने
3 हॉस्पिटलचे वाढते बिल पाहून घरी परतला अभिनेता
Just Now!
X