27 February 2021

News Flash

Movie Special : तृतीयपंथीयांच्या भावनांचा शोध घेणारा ‘नगरकीर्तन’

तृतीयपंथी समुदाय सामाजिक पूर्वग्रहांच्या दुष्परिणामांसोबत आजही झुंझत आहे.

'नगरकीर्तन'

‘नगरकिर्तन’ या बंगाली चित्रपटाने एक- दोन नाही तर चार राष्ट्रीय पुरस्कार पटकावले. समाजातील तृतीयपंथी समुदायाचं आयुष्य आणि त्यांच्या भावनांचा शोध हा चित्रपट घेतो. दिग्दर्शक कौशिक गांगुली यांनी ‘जस्ट अनादर लव्ह स्टोरी – अरेक्ती प्रेमर गोल्पो’ या चित्रपटानंतर मोठा पल्ला गाठला आहे.

गेल्या काही वर्षांपासून कौशिक गांगुली यांनी लैंगिक मुद्दयांकडे लक्ष वेधलं आहे. भारतीयांनी अतिशय सहजपणे तृतीयपंथी समाजाच्या अस्तित्वाकडेच दुर्लक्ष केलं. आजही लोकांना तृतीयपंथींच्या उपस्थितीबद्दल लाज वाटते. तृतीयपंथी समुदाय सामाजिक पूर्वग्रहांच्या दुष्परिणामांसोबत आजही झुंझत आहे. ‘नगरकीर्तन’ हा एक साधा चित्रपट असून यात पिरामलच्या कथेचा शोध घेण्यात येतो. तो मुळात एक मुलगा आहे. पण पुढे त्याला जाणीव होते की तो एका पुरूषाच्या शरीरात दडलेली स्त्री आहे. त्याचे पुढे पुती असे पुनर्नामकरण होते. ही सामाजिक द्विधा मनस्थिती पुढे अजून खराब होते जेव्हा पुतीचे एका बासरीवादक मधूवर प्रेम जडतं. समाज आणि तृतीयपंथी समुदाय अशा नात्याकडे दुर्लक्ष करतात आणि हा गुन्हा केलेल्यांसोबत अबोला धरतात.

वाचा : माझ्या जन्माच्या आधीच आई गर्भपात करणार होती, भारती सिंगचा धक्कादायक खुलासा

‘चित्रपट ही परिवर्तनाची एक भाषा असून त्याचा उपयोग प्रतिरोधाची कथा बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. जागतिक संवाद आणि हा सामाजिक मुद्दा अधोरेखित करणे ही चित्रपटाची ताकद आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की नगरकिर्तनने ते काम केलं आहे,’ असं निर्माते जॉय बी गांगुली म्हणाले.

‘नगरकीर्तन’ला मिळालेले पुरस्कार-

नगरकिर्तन – (खास ज्यूरी पुरस्कार)
सर्वोत्तम अभिनेता – रिद्धी सेन
सर्वोत्तम मेकअप कलाकार – राम रजक
सर्वोत्तम वेशभूषा – गोबिंदो मोंडोल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 2:13 pm

Web Title: movie special nagarkirtan bengali film which bagged four national awards
Next Stories
1 VIDEO : अनिल कपूर पुन्हा म्हणतोय, ‘माय नेम इज लखन’
2 ‘रेस ३’ चा मेकिंग व्हिडिओ पाहिलात का?
3 राज कपूर- नर्गिसच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा माहितीये?
Just Now!
X