News Flash

५० रुपयांत पाहता येणार मल्टिप्लेक्समध्ये ‘हे’ चित्रपट

जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी पीव्हीआर सिनेमाज, आयनॉक्स आणि सिनेपोलीस या तीन मल्टीप्लेक्स कंपन्यांनी नवी शक्कल लढवली आहे. दिवाळीनिमित्त यश राज फिल्म्सची दिमाखदार ५० वर्षे साजरी करण्यात येणार असून वायआरएफने मल्टिप्लेक्ससाठी त्यांच्या चित्रपटांची लायब्ररी कोणत्याही शुल्काशिवाय उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत प्रेक्षकांना वायआरएफचे चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये फक्त ५० रुपयांमध्ये पाहता येणार आहे.

करोना व्हायरसमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड-19 निर्देशांनुसार देशभरातील चित्रपट थिएटर्स गेल्या सात महिन्यांपासून बंद होती. त्यामुळे प्रदर्शकांचे उत्पन्न संपूर्णपणे ठप्प झाले होते. त्यामुळे यश राज फिल्म्सच्या बिग स्क्रीन सेलिब्रेशन उपक्रमाच्या माध्यमातून टॉप मल्टिप्लेक्स चेन्सना एकत्र आणून थिएटर व्यवसायाची गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

काय आहे वायआरएफ बिग स्क्रीन सेलिब्रेशन?
वायआरएफ बिग स्क्रीन सेलिब्रेशन उपक्रमांतर्गत देशभरातील मल्टीप्लेक्समध्ये कभी कभी, सिलसिला, दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे, दिल तो पागल है, वीर जारा, बंटी और बबली, रब ने बना दी जोडी, एक था टायगर, जब तक है जान, बँड बाजा बारात, सुलतान, मर्दानी, दम लगा के हैशा यांसह इतर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जातील. हे चित्रपट प्रेक्षकांना अवघ्या ५० रुपयांमध्ये पाहता येतील.

कंपन्यांचे म्हणणे काय?
या उपक्रमाबाबत माहिती देताना वायआरएफच्या मार्केटिंग आणि मर्चंडायजिंग विभागाचे सिनीयर व्हाईस प्रेसिडंट मनन मेहता यांनी सांगितले की, “आमच्या 50 वर्षांच्या वाटचालीनिमित्त प्रेक्षक आम्ही निर्माण केलेल्या विश्वाचे पुन्हा एकदा साक्षीदार बनणार आहेत. त्यांना पुन्हा एकदा क्लासिक आणि अजरामर फिल्म मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अद्भूत अनुभव घेता येणार आहे”

“फिल्म इंडस्ट्रीत गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल आम्ही वायआरएफचे मनापासून अभिनंदन करतो. भारतीय फिल्म उद्योगात यश राज फिल्म्सचे योगदान अद्वितीय स्वरुपाचे आहे. आमच्या स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण वातावरणातील चित्रपटगृहांमध्ये येऊन वायआरएफच्या बिग स्क्रीन सेलिब्रेशन उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आम्ही प्रेक्षकांना करतो”, असे पीव्हीआर सिनेमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता यांनी म्हटले आहे. आयनॉक्स लेजर लिमिटेडचे चिफ मार्केटिंग ऑफिसर सौरभ वर्मा आणि सिनेपोलीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवांग संपत यांनी देखील वायआरएफचे अभिनंदन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 6:48 pm

Web Title: movies re release in multiplex theater re open avb 95
Next Stories
1 ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’मधील सईला मिळणार जबरदस्त धक्का
2 ड्रग्ज प्रकरण : अभिनेता अर्जुन रामपालसह गर्लफ्रेंडचीही होणार चौकशी; NCBने बजावलं समन्स
3 कर्जतचा वडापाव खाण्यासाठी शिल्पा शेट्टीने थांबवली गाडी; पाहा व्हिडीओ
Just Now!
X