News Flash

चित्रपटांना च्यवनप्राशप्रमाणे मानायला हवे

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचे प्रतिपादन

(संग्रहित छायाचित्र)

चित्रपट हे आरोग्य प्रवर्तक असतात. हवं तर त्यांना च्यवनप्राश माना. जन्मत:च जसे प्रत्येकाला लिहिता वाचता येत नाही. त्यासाठी शिकावे लागते. तसेच चित्रपटही वाचायला, त्यातील रसग्रहण करून संदेशाचे आकलन शिकले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कलावंत डॉ. मोहन आगाशे यांनी येथे केले. सोसायटी फॉर वेल बियेंग अर्वे अर अँड रिहाब्लिस्टेशन-स्वर, अंतरंग व्यसन मुक्ती व पुनर्वसन केंद्र आणि अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लातुरात दोन दिवशी चित्रपट महोत्सवाचे शनिवारी डॉ. आगाशे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर होते. मंचावर स्वर या संस्थेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मििलद पोतदार, डॉ. अशोक आरदवाड, अभिजात फिल्म सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, डॉ. संजय कुर्वीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सजग कलावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. मोहन आगाशे यांनी लातूरकर प्रेक्षकांशी मुक्त संवाद साधला आणि चित्रपटाविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली. चित्रपट निर्मितीबद्दल आणि प्रेक्षकांच्या अभिरुचीबद्दल बोलताना डॉ. आगाशे म्हणाले की, ‘‘भारतीय चित्रपटाला वेगळी परंपरा आहे. या चित्रपटातील अनेक प्रसंग, कथानक, दृश्य, संगीत, अभिनय आदी गोष्टीपासून आपण आयुष्यात कसे घडतो, यावर सगळे अवलंबून असते. मन हे संगीतासारखे असते. वाद्य मोडत असते. परंतु मन हे कधी मोडत नसते. जसे आपण  कोणते पुस्तक वाचावे, हे वाचून ठरवतो. तसे कोणता चित्रपट पाहावा, कोणता पाहू नये हे आपण ठरवतो. त्याचप्रमाणे अनेक चित्रपटात आपल्याला शिकण्यासारखे बरेच काही सापडते. जो चित्रपट विचार प्रवृत्त करायला लावत नाही तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनात चिरकाल घर करू शकत नाही.

हल्ली तरुण पिढीत नराश्य मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे अनेक तरुण आत्महत्या करीत आहेत. ही समस्या समाजाला भेडसावत आहे असे सांगून ते पुढे बोलताना म्हणाले की, तरुण पिढीची समस्या मांडायला हवी. तरुणांप्रमाणे वृद्धांच्याही समस्या जटील बनल्या आहेत. त्यामुळे गावो- गावी वृद्धाश्रमांची निर्मिती होत आहे. आपण आपल्याबद्दल मुलाबाळांकडे, पती-पत्नीकडे लक्ष देतो. पण वृद्धाकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही. चित्रपट बघायला, सोशल मीडियावर सक्रिय राहायला वेळ आहे, पण घरातील वृद्धांकडे लक्ष द्यायला, त्यांच्याशी संवाद साधायला आपल्याला वेळ नाही, असेही डॉ. आगाशे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 12:36 am

Web Title: movies should be treated as chayaprashan dr mohan agashe abn 97
Next Stories
1 ‘हुड हुड दबंग’ गाण्यावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही!
2 ‘मर्दानी-२’मुळे बालपणापासून असलेली ती भीती दूर झाली -राणी मुखर्जी
3 जाहिरातींचा बदलता आशय, बदलते व्यासपीठ
Just Now!
X