News Flash

..अन् सनीच्या मदतीला धावला आमिर खान

खुद्द सनी लिओनीने याबाबतचा खुलासा केला आहे.

आमिरने दिवाळी पार्टीसाठीसुद्धा सनीला आमंत्रित केले होते.

बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता अमिर खानला चित्रपटसृष्टीमध्ये एक नवी मैत्रिण सापडली आहे. चित्रपटसृष्टीमध्ये कलाकार आणि त्यांच्यात असणाऱ्या नात्यांची समीकरण सहसा बदलत असतात. अशातच अभिनेता आमिर खानच्या सेलिब्रिटी मित्रांच्या यादीत आता एक नवे नाव समाविष्ट झाल्याचे दिसत आहे. ‘मस्तीजादे’ फेम अभिनेत्री सनी लिओनी आमिरची नवी मैत्रिण झाली आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खानने त्याच्या घरी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीसाठीसुद्धा सनीला आमंत्रित केले होते. मैत्रिच्या मार्गावर पुढचे पाऊल उचलत आमिर खानने त्याच्या अभिनयाचे प्रशिक्षक प्रकाश भारद्वाज सनी लिओनीला देऊ केले आहेत.

एका दैनिकाला दिलेल्या माहितीमध्ये खुद्द सनी लिओनीने याबाबतचा खुलासा केला आहे. आमिरच्या अभिनय प्रशिक्षकांच्या मदतीने सनी सध्या तिचे अभिनयकौशल्य खुलवत आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये सध्या सनीच्या मदतीला परफेक्शनिस्ट आमिर खान धावून गेल्याचे पाहायला मिळतेय. प्रकाश भारद्वाज हे आमिरचे अभिनय प्रशिक्षक आहेत. ‘रंग दे बसंती’ या चित्रपटापासूनच ते आमिरसोबत काम करत आहेत. त्याच्या आगामी ‘दंगल’ या चित्रपटातील अस्खलित हरयाणवी बोलीभाषेमागेही भारद्वाज यांचाच हात आहे. बी टाऊनमध्ये प्रकाश भारद्वाज हे काही नवे नाव नाही. प्रिती झिंटा, कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींसोबत आणि इतर कलाकारांसोबतही भारद्वाज यांनी काम केले आहे. सध्या ते सनी लिओनीच्या हिंदी संभाषण कौशल्यावर काम करत असल्याचेही भारद्वाज यांनी स्पष्ट केले आहे.

पॉर्नस्टार म्हणून ओळखल्या जाणऱ्या सनी लिओनीने काही वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणानंतर काही चित्रपटांतून काम करणाऱ्या सनीच्या वाट्याला सुरुवातीच्या काळात अपयश आलं होतं. पण, त्यानंतर अवघ्या काही काळातच सनी लिओनीचे बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 11:47 am

Web Title: mr perfectionist aamir khan lends his acting coach to sunny leone
Next Stories
1 माझा पार्टनर हॉट नसला तरी चालेल- आलिया भट्ट
2 करण जोहर करणार ‘सैराट’चा रिमेक?
3 Salman khan Nephew: ‘सलमान माझ्या मुलाला बिघडवतोय’
Just Now!
X