10 July 2020

News Flash

शिवजयंती दणक्यात साजरी करणाऱ्यांना मृणाल कुलकर्णींचा मार्मिक प्रश्न

शिवडी किल्ल्यावरचा फोटो पोस्ट करत मृणाल कुलकर्णींनी मांडले विदारक वास्तव..

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यंदाही धुमधडाक्यात साजरी झाली. शिवजयंती साजरी करण्याचे नवनवे फंडे शिवप्रेमींनी आणले. कुठे मिरवणूक, कुठे सेल्फी, कुठे बाईक रॅली तर कुठे डीजे… मात्र या धुमधडाक्यात मूळ शिवविचारच जपण्यास आपण कमी पडतोय का असा अप्रत्यक्ष प्रश्न अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने उपस्थित केला आहे. शिवडी किल्ल्याचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आणि या फोटोद्वारे त्यांनी शिवप्रेमींना हा प्रश्न अप्रत्यक्षपणे विचारला आहे.

शिवडी किल्ल्याच्या भिंतीवर प्रेमीयुगुलांनी नावं कोरली आहेत तर काहींनी भिंतीवर गिरवून ठेवलंय. या भिंतीसमोर उभं राहून मृणाल कुलकर्णी यांनी फोटो काढला आहे आणि हाच फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याचसोबत त्यांनी मनाला भिडणारी एक कवितासुद्धा पोस्ट केली आहे. ‘पलीकडच्या काठावर जिरेटोप घातलेला एक अस्वस्थ माणूस…दोन्ही हातात तलवार घेऊन..स्वतःचे हात कापत होता…’, या कवितेच्या शेवटच्या दोन ओळी नि:शब्द करतात.

शिवजयंती दणक्यात साजरी करताना आपण किल्ल्यांचे किती संवर्धन करतो, किल्ल्यांवर पर्यटनासाठी जाताना आपण शिस्त किती बाळगतो, याचा विचार केला पाहिजे, असं त्यांनी या पोस्टद्वारे अप्रत्यक्षपणे म्हटलंय. ‘आपण ही प्रवृत्ती कधी सोडणार’, ‘विदारक सत्य’, अशा प्रतिक्रिया मृणाल कुलकर्णींच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2020 5:34 pm

Web Title: mrinal kulkarni posted shivdi fort wall picture after shiv jayanti and asked question to people ssv 92
Next Stories
1 …तर मीसुद्धा बुरखा घातला असता; ए. आर. रहमान यांचं मुलीच्या बुरखा प्रकरणावर उत्तर
2 ‘दिल्ली क्राइम 2’ मध्ये खरा आयएएस अधिकारी साकारणार वेब सीरिजमधील भूमिका!
3 प्रेमात ‘बेधुंद’ होण्यासाठी नेहा राजपाल व हर्षवर्धनचे नवीन गाणे
Just Now!
X