News Flash

‘मिसेस श्रीलंका’ विजेतीचं मुकूट हिसकावल्यामुळे परिक्षकाला अटक

जाणून घ्या सविस्तर काय आहे प्रकरण...

‘मिसेस श्रीलंका’ ही सौंदर्य स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. पण या स्पर्धेतील एक अजब व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या स्पर्धेची विजेती पुष्पिका डी सिल्वा असल्याचे परिक्षकांनी घोषीत केले. पण नंतर काही वेळातच तिच्याकडून विजेतेपदाचं मुकूट हिसकावून घेण्यात आले. त्यानंतर पुष्पिकाने परिक्षकांविरोधात पोलिसात तक्रार केली.

मिसेस श्रीलंका २०१९चे विजेतेपद पटकावणारी कॉरोलिन परिक्षक म्हणून सहभागी झाली होती. तिने पुष्पिकाला विजेती घोषित करुन मुकूट घातला होता. पण काही वेळा नंतर ती पुन्हा मंचावर आली आणि तिने पुष्पिकाचे मुकूट हिसकावून घेतले. पुष्पिका ही घटस्फोटीत असल्याचे म्हणत कॅरोलिनने तिला स्पर्धेसाठी अपात्र असल्याचे ठरवत उपविजेतीला मुकूट घातले. ‘मिसेस श्रीलंका’ ही स्पर्धा केवळ विवाहित महिलांसाठी असल्याचे कॉरोलिनने म्हटले.

पण पुष्पिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत ‘मी एक घटस्फोटीत महिला नाही. त्यांना जर वाटत असेल की मी घटस्फोटीत आहे तर त्यांनी माझे घटस्फोटाचे कागद आणून दाखवावेत. मी माझ्या पती पासून वेगळी झाले आहे पण आम्ही घटस्फोट घेतलेला नाही’ असे म्हटले होते.

Video : म्हणून परिक्षकाने हिसकावलं ‘मिसेस श्रीलंका’ स्पर्धेच्या विजेतीचं मुकूट

झूमने दिलेल्या वृत्तानुसार, कोलंबो पोलिसांनी कॅरोलिनला पुष्पिकाचे मुकूट हिसकावत तिचे केस खेचल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलीस अधिकारी अजित रोहाना यांनी याबाबत माहिती देत म्हटले, ‘आम्ही परिक्षक आणि (तिचा सहकारी) चुला मनमेंद्रला मारहाण आणि नेलम पोकुना (थेएटर) नुकसानीच्या आरोपाखाली अटक केली आहे.’

पुष्पिकाकडून मुकूट हिसकावून घेतल्यानंतर ती तेथून बाहेर पडली. बाहेर आल्यानंतर तिने प्रासार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ती म्हणाली जर कॅरोलिनने तिची सर्वांसमोर माफी मागितली तर ती पोलीस तक्रार मागे घेणार. ती कॅरोलिनला माफ करणार नाही पण हे सर्व विसरुन जाईन असे म्हटली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 10:58 am

Web Title: mrs world arrested after snatching mrs sri lankas crown avb 95
Next Stories
1 बिग बॉसमधील अभिनेत्रीचा लग्नानंतर आत्महत्येचा प्रयत्न; ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल
2 अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या ‘पुष्पा’चा सोशल मीडियावर धुमाकुळ, चाहत्यांकडून मोठी पसंती
3 “२५ वर्षांपुढील सर्वांना लस उपलब्ध करावी”, सोनू सूदची सरकारकडे मागणी
Just Now!
X