X

‘या’ मालिकेतून मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

मालिकेतून मृणाल दुसानिस – शशांक केतकरची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेतील जुई म्हणून मृणाल दुसानिसला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मृणालचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘हे मन बावरे’ मालिका ९ ऑक्टोबरपासून कलर्स मराठीवर सुरू होत आहे. यामध्ये ‘बिग बॉस मराठी’ स्पर्धेत टॉप ५पर्यंत पोहोचलेली स्पर्धक अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतसुद्धा झळकणार आहे. शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन जोडी बघायला मिळणार आहे. या दोघांना पहिल्यांदाच एकत्र काम करताना बघणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

वाचा : ‘बिग बॉस १२’च्या घरात ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री 

या मालिकेची कथा काय असेल ? मालिकेमध्ये अजून कोणते कलाकार असतील ? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.