News Flash

मराठी मालिकेत काम करणाऱ्या ‘या’ स्टारकिडला ओळखलं का?

तो एक अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शकसुद्धा आहे.

कलाकार हे नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सतत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोहबत शेअर करताना दिसतात. नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन तो अभिनेता कोण आहे हे तुम्ही ओळखलं का? हा अभिनेता सध्या ‘माझा होशील ना’ या मालिकेत काम करताना दिसत असून स्टारकिड आहे.

सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या फोटोमधील हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी आहे. विराजसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘मला असे वाटते की लहानपणापासूनच कॅमेराकडे न पाहाण्याची मला सवय आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : ‘द कपिल शर्मा’ शोमधील अभिनेत्रीने केले लग्न, पाहा फोटो

विराज सध्या ‘माझा होशील ना’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. ही मालिका सध्याच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. विराजसने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटातही काम केले आहे. तो एक अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शकही आहे. त्याने आई मृणाल कुलकर्णीच्या ‘रमा माधव’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 5:13 pm

Web Title: mrunal kulkarni son virajas kulkarni childhood photo avb 95
Next Stories
1 झी टॉकीजवर महाराष्ट्र दिन विशेष फिल्म फेस्टिवल
2 ‘या’ कारणामुळे अभिनेता जिम्मी शेरगिलवर गुन्हा दाखल, पंजाब पोलिसांची कारवाई
3 Indian Idol 12: सायली कांबळेचे वडील करोना रुग्णांसाठी चालवतात रुग्णवाहिका
Just Now!
X