‘बाटला हाउस’ आणि ‘सुपर 30’ सारख्या हिट चित्रपटांनंतर अभिनेत्री मृणाल ठाकुर लवकरच राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी ‘तूफ़ान’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात फरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल आणि सुप्रिया पाठक हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मृणाल ठाकूर या चित्रपटात अनन्या ही भूमिका साकारणार असून अनन्या चित्रपटात मराठी भाषेत बोलताना दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तूफ़ान’ या स्पोर्ट्स ड्रामामध्ये मृणाल ठाकुरला आपली मातृभाषा मराठीमध्ये बोलण्याची संधी दिली आहे. याविषयी बोलताना मृणाल म्हणाली की, “सर्वात चांगली गोष्ट ही आहे की अनन्या आणि मी दोघीही महाराष्ट्रातील आहोत. तुम्ही मला या चित्रपटातमध्ये मराठी बोलताना पाहाल आणि ते नैसर्गिकरित्या ओघात आलेले आहे. जेव्हा तुमच्यासोबत परेश सरांसारखे कलाकार असतात जे मराठीत प्रतिक्रिया देतात, तेव्हा ती एक छान संवादाची आणि मजेची जागा बनून जाते.”

पुढे मृणाल सांगते की, “माझी व्यक्तिरेखा अनन्या ना केवळ अज्जू (फरहान अख्तर)च्या जीवनात, परंतु त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनात देखील प्रेरक आहे. ती खूप उदार, समर्पित आणि दूरदृष्टि असलेली मुलगी आहे. ऑफ स्क्रीन, मी अनन्याकडून प्रेरित आहे आणि ज्या तऱ्हेने ती गोष्टी बघते. अनन्याचा समानतेवर विश्वास आहे आणि जीवनातील तिचे उद्द्येष्य लोकांना प्रेरित करणे हे आहे.”

‘तूफ़ान’ची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांनी केली असून त्याचा प्रीमियर २१ मे २०२१ ला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrunal thakur going to speak in marathi in tufan movie avb
First published on: 07-04-2021 at 17:43 IST