News Flash

Mubarakan: अथिया- अर्जुनची ‘क्युट केमिस्ट्री’

प्रेक्षकांना पाहता येणार एका कमाल कुटुंबाची धमाल गोष्ट

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

अर्जुन कपूरचा आगामी ‘मुबारका’ हा चित्रपट त्याच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठीसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण, या चित्रपटामध्ये एका कमाल कुटुंबाची धमाल गोष्ट पाहता येणार आहे. विविध कार्यक्रमामध्ये आतापर्यंत अर्जुनला ‘मुबारका’विषयी बरेच प्रश्न विचारण्यात आले. मुळात या प्रश्नांची उत्तरं देत ‘मुबारका’विषयी तो भरभरुन बोलला. त्यामुळे नेमका हा चित्रपट त्याच्या मनाच्या इतक्या जवळ का असाच प्रश्न राहून राहून पडत होता. अर्जुनने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याची आणि अथिया शेट्टीची ‘मुबारका’तील केमिस्ट्री पाहायला मिळतेय.

हल्लीच्या तरुणाईला हा फोटो अगदी त्यांच्या जवळ जाणारा वाटेल. कारण, यामध्ये कोणतीही पोझ ओढून ताणून दिल्यासारखी वाटत नाहीये. अर्जुनने हा फोटो पोस्ट करत तो आणि अथिया साकारत असलेल्या पात्रांची ओळखही करुन दिली आहे. ‘हॅल्लो….अॅण्ड सतश्रीअकाल…फ्रॉम चरण अॅण्ड बिंकल’ असं कॅप्शन त्यानं दिलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अथिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. सुरज पांचोलीसोबत ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर ती प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

‘मुबारका’ या चित्रपटातून अभिनेता अनिल कपूरही झळकणार असल्यामुळे रिअल लाइफ ‘चाचा- भतिजा’ जोडीची धमालही पाहायला मिळणार आहे. ‘मुबारका’चं चित्रीकरण सुरु झाल्यापासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता पाहायला मिळतेय. तुर्तास अर्जुन कपूर येत्या काही दिवसांमध्ये ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 5:21 pm

Web Title: mubarakan bollywood movie charan and binkle make cutest couple arjun kapoor and athiya shetty
Next Stories
1 सलमानच्या घरासमोरील शौचालय हटवण्याचे महापौरांचे आदेश
2 सुशांत-अंकिताचे ‘पॅच अप’?
3 जस्टिन बिबर करणार ‘कॉफी विथ करण’च्या नव्या पर्वाची सुरुवात ?
Just Now!
X