News Flash

Mubarakan song Hawa Hawa: अर्जुन तिचा बॉयफ्रेंड बनण्यासाठी तयार

अर्जुनचा जुनाच अवतार नव्याने आपल्याला पाहायला मिळणार

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर

‘मुबारका’ सिनेमाच्या ‘हवा हवा’ गाण्याचा टिझर पाहून अनेकांनाच हे गाणे कधी प्रदर्शित होणार असे झाले होते. या गाण्यातून अर्जुन कपूरचा जुनाच अवतार नव्याने आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्जुनला आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्रीच्या मागे धावताना, तिला इम्प्रेस करण्यासाठी नानाविध करामती करताना पाहिले आहे. या गाण्यातही अर्जुन त्याचा तोच कित्ता गिरवताना दिसतो. हे गाणे अर्जुन आणि त्याची हिरोईन इलियाना डिक्रुझवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. बॉलिवूडची जशी उडती गाणी असतात त्याचपद्धतीचं हेही गाणं आहे. पाठीमागे नाचणारे डान्सर, खूप सारे प्रॉप्स या साऱ्यांचाच वापर या गाण्यात केला आहे.

नवाज, शाहरुख अडचणीत ५०० कोटींच्या घोटाळ्यात उघड झाले नाव

मिका सिंग आणि प्रक्रिती ककरने हे गाणं हायले असून बॉस्को- सिझरने हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे. बॉस्को- सिझरने आतापर्यंत अनेक बॉलिवूड गाण्यांना कोरिओग्राफ केले आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलेला. या ट्रेलरमध्ये सर्वांत लक्षवेधी अनिल कपूरवरच होते. या सिनेमातून अनिल आणि अर्जुन ही काका- पुतण्यांची जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे गाणं शेअर करताना म्हटले की, ‘घ्या… झालं कल्याण’

अनिझ बाझमी यांचा ‘मुबारका’ या सिनेमाची कथा अशा क्रेझी कुटुंबाभोवती फिरत असते. या कुटुंबामध्ये करण आणि चरण अशी जुळी मुलं असतात. या जुळ्या मुलांची व्यक्तिरेखा अर्जुनने साकारली असून त्याच्या काकांची म्हणजेच करतार सिंग ही व्यक्तिरेखा अनिल कपूरने साकारली आहे. या दोघांमुळे कुटुंबात किती गोंधळ उडतो ते दाखवण्यात आले आहे. अनिझ यांच्या नावावर ‘नो एण्ट्री’, ‘सिंग इज किंग’, आणि ‘रेडी’ अशा अनेक यशस्वी विनोदी पटांची यादी आहे.

…म्हणून सनी लिओनीला सलमान सर्वात जास्त आवडतो

या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक अनीस आणि अभिनेता अनिल कपूरची जोडी चौथ्यांदा एकत्र काम करत आहे. याआधी ‘नो एण्ट्री’, ‘वेलकम’ आणि ‘वेलकम बॅक’ या सिनेमांसाठी या दोघांनी एकत्र काम केलंय. २८ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात अभिनेत्री इलियाना डिक्रुझ आणि अथिया शेट्टीसुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या या भूमिकांची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळत आहेच. पण, नेमका हा मुबारका कोणासाठी आनंददायी ठरणार, चरणसाठी की करणसाठी हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 5:59 pm

Web Title: mubarakan song hawa hawa arjun kapoor dances on the streets asking ileana dcruz boyfriend bana le watch video
Next Stories
1 VIDEO : इतिहासातील राजकीय घडामोडींना पुन्हा जागवणारा ‘राग देश’
2 पहिल्यांदाच नवाजुद्दीन, तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी दिसणार या मराठी चित्रपटात
3 …म्हणून सनी लिओनीला सलमान सर्वात जास्त आवडतो
Just Now!
X