19 October 2019

News Flash

‘पती,पत्नी और वो’ च्या रिमेकमध्ये ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची वर्णी

अभिनेत्री सारा अली खानदेखील या अभिनेत्याची मोठी फॅन आहे.

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक नावाजलेल्या चित्रपटांचे रिमेक करण्यात आले आहेत. यामध्ये ९० च्या दशकातील अनेक चित्रपटांचा समावेश आहे. ‘देवदास’, ‘जंजीर’, ‘इत्तेफाक’, ‘डॉन’, ‘अग्निपथ’, ‘जुडवा’ यासारख्या चित्रपटांच्या रिमेकनंतर आता लवकरच १९७८मध्ये हिट ठरलेल्या ‘पती,पत्नी और वो’ या चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार असून या रिमेकमध्ये बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्याची वर्णी लागल्याचं सांगण्यात येत आहे.

‘पती,पत्नी और वो’ च्या रिमेकमध्ये अभिनेता अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि तापसी पन्नू ही कलाकार मंडळी झळकणार असल्याचं चर्चा होती. मात्र ‘पिपिंगमून’च्या वृत्तानुसार, या चित्रपटामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण फेब्रुवारीमध्ये सुरु होणार असून कार्तिक आर्यन व्यतिरिक्त या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे स्पष्ट झालेलं नाही.

१९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असून त्याला विनोदाची किनार आहे.या कारणास्तव  हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं या हेतूने मुदस्सर अजीज यांनी रिमेक करण्याचा निर्णय घेतला आहे. मुदस्सर अजीज ‘पती,पत्नी और वो’ च्या रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाचा मूळ आशय तोच ठेऊन यामध्ये मॉर्डन ट्विस्ट करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ‘पती,पत्नी और वो’ हा चित्रपट बी.आर.चोपडा यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटाच्या रिमेकची जबाबदारी मुदस्सर अजीज यांनी स्वीकारली आहे.  तर जुनो चोपडा आणि अभय चोपडा टी-सीरिजचे भूषण कुमार यांच्या सहयोगाने या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

First Published on January 12, 2019 10:01 am

Web Title: mudassar azizs pati patni aur woh remake