News Flash

आयुष्यातील चढ-उताराचा वेध घेणारा ‘वलय’

‘तुझ्या प्रेमात मन हे माझे आज गुंतले’ हे प्रेमगीत गायक स्वप्नील बांदोडकर यांनी स्वरबद्ध केलं

वलय या वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच गीत ध्वनीमुद्रणाने संपन्न झाला.

मराठी चित्रपटात नावीन्यपूर्ण विषयांची सातत्यपूर्ण निवड होत आहे. प्रभावी कथानक, वेगळी हाताळणी या वैशिष्ट्यामुळे मराठी चित्रपटाची दखल सातासमुद्रापारसुद्धा घेतली जाऊ लागली आहे. विशाखा मिडिया वर्क्स निर्मित व निकी बत्रा दिग्दर्शित वलय या वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच गीत ध्वनीमुद्रणाने संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच पद्मश्री गुरु अफसार खान यांची विशेष उपस्थिती होती.
‘तुझ्या प्रेमात मन हे माझे आज गुंतले’ हे प्रेमगीत गायक स्वप्नील बांदोडकर यांनी स्वरबद्ध केलं असून याच गीतलेखन व संगीत प्रकाश प्रभाकर याचं आहे. हे प्रेमगीत प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल असा विश्वास गायक स्वप्नील बांदोडकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
प्रत्येकाला काहीतरी शिकवून जात असतो. याच चढ-उताराचा वेध कबड्डी खेळाच्या माध्यमातून वलय चित्रपटातून घेण्यात आला आहे. अशोक कुंदनानी निर्मित या चित्रपटात अजिंक्य देव, रेशम टिपणीस, सुरेखा कुडची, अभिलाषा पाटील, आरती सपकाळ, अमिषा आंबेकर, वैभव आमटे, सायरा खान, रितू नचणी, नीरज अंबुले, फहीम खान, अनिकेत मोगरे, विनायक पुजारी, रक्षित देशमुख या कलाकारांच्या भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 2:10 pm

Web Title: muhurat of the film valay
Next Stories
1 Bigg Boss 10: ‘बिग बॉस’च्या घरात चोरी करताना दिसले स्वामीजी
2 ‘पान बहार तंबाखू उत्पादन असल्याचे माहित नव्हते’
3 वैदर्भीय रंगकर्मीची टीव्ही मालिकेत दमदार एंट्री
Just Now!
X